मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Benefits of Neem : सौंदर्य आणि आरोग्यासाठी गुणकारी आहे कडुलिंब, जाणून घ्या फायदे

What are the benefits of neem
आयुर्वेदमध्ये कडुलिंबाला औषधीयुक्त सांगितले आहे. सौंदर्य पासून तर आरोग्यापर्यंत सर्वांमध्ये कडुलिंब गुणकारी मानला गेला आहे. चेहऱ्यावरील मरूम असो व पोटाची समस्या कडुलिंबाच्या पानांनी खूप फायदे होतात. चला तर जाणून घेऊ या कडुलिंब आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी किती महत्वपूर्ण आहे. 
 
चेहऱ्यावर जर मुरुम असतील तर कडुलिंब तुमच्या कामास येईल. म्हणून नियमित रूपाने कडुलिंबाचे ज्यूस सेवन करावे. कडुलिंबाचे पाने स्वच्छ धुवून ते बारीक करावे व ज्यूस तयार करावे. हे ज्यूस घेतल्यास तुमचे रक्त शुद्ध होईल. तसेच त्वचा उजळेल. आणि मुरुम समस्या देखील दूर होईल. 
 
रुक्ष आणि कोरडे केस चांगले होण्यासाठी कडुलिंबाचे पाने उकळवून त्यांना तेलात मिक्स करून लावावे. यामुळे केसांमध्ये चमक येईल. सोबतच केस गळती देखील बंद होईल. 
 
चेहऱ्यावरील मुरुम, पुटकुळया यांच्या पासून आराम मिळण्यासाठी कडुलिंबाचा फेसमास्क देखील फायदेशीर आहे. कडुलिंबाचे पाने स्वच्छ धुवून बारीक करून त्याची पेस्ट बनवणे आणि नियमित रुपाने चेहऱ्यावर लावावे. याच्या नियमित उपयोगामुळे चेहऱ्यावर चमक येईल. सोबतच मुरुमचे डाग देखील निघून जातील. 
 
डोकेदुखी, दाताचे दुखणे, हात-पायाचे दुखणे, यापासून आराम मिळण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची मॉलिश करणे फायदेशीर ठरते. कडुलिंबाच्या फळाचा उपयोग कफ आणि कृमि‍नाशक रूपामध्ये केला जातो. तसेच कडुलिंबाच्या पानांना बारीक करून जखमेवर आणि जिथे दुखत असेल तिथे लावाले तर लागलीच आराम मिळतो.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik