बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Sugar scrub : चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी साखरेच्या स्क्रबचा उपयोग करा

आजकालच्या धावपळीच्या जीवनाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. सततच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपली त्वचा खूप खराब दिसायला लागते. तसेच त्वचा कोरडी पडते. सततच्या बदलत्या वातावरणात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. पुष्कळ लोक चेहऱ्याला चमक यावी म्हणून वेगवेगळे महाग प्रोडक्ट वापरतात. पण याचा परिणाम जास्त दिवस राहत नाही. या प्रोडक्टमध्ये समाविष्ट असलेल्या तत्वांमुळे फायदा न होता नुकसान होते. आम्ही तुम्हाला साखरेचे काही खास प्रकारचे स्क्रब सांगत आहोत ज्यामुळे तुमचे जास्त पैसे खर्च होणार नाही आणि त्वचा उजळ होईल. 
 
ग्रीन टी आणि साखर- ग्रीन टी मध्ये अनेक प्रकारचे तत्व असतात. जे त्वचेला उजळण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही ग्रीन टी च्या मदतीने स्क्रब बनवले तर तुमची पिंपल्सची समस्या निघून जाईल. या स्क्रबला बनवण्यासाठी एका छोट्या बाऊलमध्ये ग्रीन टी घ्या, यात एक चमचा साखर मिसळा. आता या पेस्टने चेहऱ्यावर मसाज करणे. काही वेळानंतर चेहरा धुवून घ्या. 
 
हळद आणि साखर- त्वचेच्या अनेक समस्यांना दूर करण्यासाठी हळद खूप फायदेशीर असते. एका बाऊलमध्ये हळद घेऊन त्यात मध व साखर मिक्स करा. हे चांगले मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब करा. काही वेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. 
 
टोमॅटो आणि साखर- हा स्क्रब सर्वात सोप्या पद्धतीने बनवला जातो. एका टोमॅटोला अर्धा कापून त्यावर साखर टाकून स्क्रब करा. व स्क्रब केल्यानंतर चेहरा धुवून टाका. 
 
लिंबू आणि साखर-  लिंबू त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर करतो. त्वचा जर काळवंडली असेल तर यामुळे ही समस्या दूर होते. एका बाऊल मध्ये साखर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करून त्यात थोडे मध टाका. आता या पॅकने चेहऱ्यावर मसाज करा. आणि काही वेळानंतर चेहरा धुवून टाका.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik