सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (16:46 IST)

Home Remedies for Dandruff: केसातील कोंडा कसा होतो, कोंड्यावर उपाय जाणून घ्या

Dandruff : अनेक लोकांना केसातल्या कोंड्यामुळे होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागत असतो. ही समस्या वारंवार डोकं वर काढत असते.कोंडा ही समस्या तशी अगदीच सर्वसामान्य आहे.
 
कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत.या बुरशी किंवा फंगसचे नाव मालासेजिआ ग्लोबोसा हे आहे. प्रामुख्यानं या फंगस मुळेच ड्रँड्रफची समस्या उद्भवते. हे फंगस त्वचा आणि केसांमधून तेल शोषून घेतं आणि ओलेइक नावाचं एसिड तयार करत या मुळे केसांना खाज येते. तसेच वायू प्रदूषणामुळे देखील केसात कोंडा होतो. केसातील कोंड्यामुळे कुठेही समारंभात जाण्यासाठी देखील अपमानास्पदहोते. कोंडा दूर करण्याचे काही चांगले उपाय आहे. चला जाणून घेऊ या.
 
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी उपाय- 
* नियमितपणे केस विंचरणे.
* अँटी फंगल अँटी डेंड्रफ शाम्पूचा नियमित वापर करावा. 
* कोरफडीचा रस लावून केसांना मसाज करणे.
* नारळाच्या तेलात कापूर मिसळून मसाज करावी.
* पाणी -व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावावा.
* दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोनचमचे पाणी घेऊन मिसळून केसांना लावा नंतर 15 मिनिटांनी धुवून घ्या.कोंडा कमी होईल. 
 
Edited by - Priya dixit