बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 9 मे 2023 (15:29 IST)

Homemade lip balm नैसर्गिक गुलाबी ओठ मिळवा

lips care tips
होममेड लिप बाम
 
साधा लिप बाम 
एक कंटेनर किंवा हीटप्रूफ कप घ्या आणि त्यात 1 चमचा मेण घाला. आता अर्धा चमचा न्यूटेला घाला. नंतर नारळ तेळ घालून उकळून घ्या. मिश्रण वितळून गेल्यावर एक डबीत काढून फ्रीजरमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून द्या. लिप बाम तयार आहे.
 
रंगीत लिप बाम
एक चमचा वेसिलीन एका काचेच्या ग्लासात घेऊन ओव्हनमध्ये घेऊन दोन मिनिटांसाठी वितळून घ्या. नंतर आवडीच्या रंगाचं आयशेडोचे तुकडे घालून घ्या. नंतर मिश्रण योग्य रीत्या हालवून घ्या. यात जरा मध मिसळा. नंतर मिश्रण फ्रीजमध्ये गार होऊ द्या.
 
अजून एक पद्धत 
एका भांड्यात दोन चमचे नारळ तेल, एक चमचा शिया बटर, एक चमचा मध, अर्धा चमचा चुकंदर पाउडर, एसेंशियल ऑयल मिसळून घ्या. हे लहान डबीत स्टोर करुन वापरा.