संबंधित माहिती
- Hair Serum नारळाचं तेल आणि कोरफडीने या प्रकारे तया करा हेअर सीरम
- Madhuri Dixit Hair Care Tips: सुंदर केसांसाठी माधुरी दीक्षितची DIY हेअर मास्क आणि हेअर पॅक रेसिपी जाणून घ्या
- Garlic For Dandruff: कोंडा दूर करण्यासाठी लसणाचा उपाय करा
- हेअर जेल आपल्याला सूट होत की नाही कसे जाणून घ्याल
- Thursday in astrology घरात पीडा येईल.. जर गुरुवारी ही 7 कामे करत असाल तर थांबवा
How to use conditioner कंडिशनरचा वापर कसा करावा
How to use conditioner केसांचे सेटिंग करण्यापूर्वी कंडिशनिंग करून घ्यावे. केस अधिक चांगले सेट करता येतात. कंडिशनर केवळ केसांना लावावा. शक्यतोवर टाळूला कंडिशनर लावू नये.
कंडिशनिंग करण्यापूर्वी केस व्यवस्थित धुऊन घ्यावेत, म्हणजे केसांवरील डिटर्जंट पूर्णपणे निघून जाईल.
कंडिशनर वापरण्यापूर्वी केसांमधील जास्तीचे पाणी कमी करून घ्यावे व मगच केसांना कंडिशनर चोळून लावावा. साधारणपणे पाच मिनिटांनंतर कंडिशनर पूर्णपणे धुऊन घ्यावा.
केस अगदीच खराब झालेले असल्यास, आणि डीप कंडिशनिंगची आवश्यकता असल्यास कंडिशनरचे प्रमाण थोडे अधिक घ्यावे व थोडा अधिक वेळ कंडिशनवर लावून ठेवावा.
घरच्याघरी कंडिशनर करायचा असल्यास अंडे, मेंदी, मेथी किंवा जास्वंदाच्या पानांचा वापर करता येईल.
कंडिशनरच्या वापरामुळे केसांवर एक संरक्षक आवरण निर्माण होते. याच्यासाठी कंडिशनिंग करण्यापूर्वी शँपू वापरून केस स्वच्छ करून घ्यावेत आणि नंतरच कंडिशनिंग करावे.
