सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (18:14 IST)

हेअर जेल आपल्याला सूट होत की नाही कसे जाणून घ्याल

Hair
Hair Gel अलीकडे हेअर जेल वापरण्याची फॅशन पुन्हा एकदा तरुणांमध्ये रुजू लागली आहे. अर्थात हेअर जेल वापरण्याची पद्धत ही काही नवीन नाही. प्राचीन काळातील इजिप्तच्या ममींचे जेव्हा संशोधन केले गेले तेव्हा या ममींच्या केसाला चरबीयुक्त जेल लावले असल्याचे संशोधनात लक्षात आले आहे. इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठातील के. एन. एच. सेंटर फॉर बायोमेडिकल इजिप्टोलॉजेचे पुरातत्व शास्त्रज्ञ नताली मक्रेशन यांनी 18 ममींचा याबाबत अभ्यास केला. यातील सर्वांत जुनी ममी 3500 वर्षे जुनी आहे. अलीकडच्या काळात म्हणजे 1960 मध्ये युनायटेड स्टेट्‌समध्ये केसांसाठी आधुनिक जेलची निर्मिती केली गेली.  
 
केसांवर चमक येण्यासाठी आणि केसांना एक चांगले वळण यावे यासाठी जेलचा वापर केला जातो. यामध्ये आता कलरफुल प्रकार देखील आले आहेत. अर्थातच या जेलमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केलेला असतो. हे रंग तात्पुरते असतात. केसांची ठेवण, त्याचा पोत यावर कोणते जेल वापरायचे हे ठरवले जाते. जेल लावल्यानंतर केस धुतले आणि ते कोरडे पडले तर हे जेल आपल्याला सूट होत नाही, असे समजावे.