सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)

घरात गुलाब पाणी कसे बनवायचे सोपी पद्धत जाणून घ्या

जेव्हा देखील गोष्ट येते त्वचेची काळजी घेण्याची तेव्हा गुलाब पाण्याचे नाव आवर्जून घेतले जाते. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकता. ह्याचा अधिक वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. जे त्वचेला फायदा देतो. 
गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम.घरात गुलाबपाणी तयार करण्याच्या काही सोप्या प्रक्रिया आहे . चला तर मग जाणून घेऊ या. 
 
सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या.पाकळ्या वेगळ्या करा. 
एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी गरम करण्यासाठी ठेवा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या देखील धुऊन घ्या. या गरम पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून द्या आणि उकळवून घ्या. या पाकळ्या पांढऱ्या रंगाचा होतील. आता हे पाणी गाळून घ्या आणि स्वच्छ बाटलीत भरून ठेवा आपण हे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. तयार आहे घरात बनलेले गुलाब पाणी आपण हे आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी देखील वापरू शकता.