मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)

केसांना घनदाट आणि लांब करण्यासाठी दही वापरा

दह्याचा वापर आपण आहारात करतोच परंतु हे त्वचेसाठी आणि  केसांसाठी जणू एक वरदान आहे. केसांना वाढविण्यासह केसांची चमक परत मिळते. जर आपले केस रुक्ष झाले आहे गळत आहे तर दह्याचे हेयर मास्क लावून केसांची चमक पुन्हा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1  अंडी आणि दह्याचे मास्क -
अंडी मध्ये पेप्टाइड्स आढळतात जे केसांची वाढ करतात. केसांना निरोगी करतात या साठी आपण एक अंडी फोडून फेणून घ्या या मध्ये 2 मोठे चमचे दही मिसळून पेस्ट बनवा. केसांना विभागून ही पेस्ट मुळापासून टोकापर्यंत लावा आणि अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा नंतर थंड पाणी आणि शॅम्पूने धुऊन घ्या.
 
2 केळी आणि दह्याचे मास्क-
केळीमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन्स असतात जे केसांना पोषण देण्याचे काम करतात. हे स्कॅल्प च्या आरोग्याला सुधारते. केसातील कोंडा कमी करतो. केसांना चमकदार बनवतो. केसांना तुटण्यापासून वाचवतो. हे मास्क लावल्याने केस घनदाट होतात केसाचे मास्क बनविण्यासाठी अर्धा पिकलेले केळी घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा दही, तीन चमचे मध आणि एक लहान चमचा लिंबाचा रस मिसळून मऊ पेस्ट बनवा हे मुळापासून टोकापर्यंत लावा आणि अर्धा तास तसेच ठेवा. नंतर शॅम्पू लावून केस पाण्याने धुऊन घ्या.
 
3 दही आणि मध मास्क- 
मध हे केसांना कंडिशन करतो या मुळे कोंडा आणि केस गळतीची समस्या दूर होते. तसेच केस घनदाट होतात. या साठी अर्धा कपदह्यात एक लहान चमचा मध आणि सफरचंदाचे व्हिनेगर घालून मिसळा. आता हे मास्क केसांना लावून अर्धा तास तसेच ठेवा नंतर शॅम्पू लावून पाण्याने केस धुऊन घ्या.