गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (20:56 IST)

केसांना तेल लावताना या चुका करू नका

केसांना निरोगी राखण्यासाठी डोक्याला तेल लावणे महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येक वेळी डोक्याला तेल लावू नये. तसेच तेल लावताना काही गोष्टींची काळजी  घेणं महत्त्वाचे आहे. असं न केल्याने आपल्या केसांना नुकसान होऊ शकत.चला तर मग जाणून घेऊ या की केसांना तेल लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावयाची आहे. 
 
1 तेल लावण्यापूर्वी केसांना उलगडून घ्या-  
तेल लावण्यापूर्वी केसांना चांगल्या प्रकारे उलगडून घ्या.केसांना कंगवा केल्या शिवाय तेल लावू नका. तेल लावण्यापूर्वी त्यांना मोकळे करा जेणेकरून ते तुटणार नाही.
 
2 हळुवार हाताने मॉलिश करा-
केसांना तेल लावताना हळुवार हाताने मॉलिश करावी. जोरात मॉलिश केल्याने केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. ज्या लोकांचे केस जास्त गळतात त्यांनी केसांचे समभाग करून केसांना तेल लावावे.
 
3 मॉलिश नेहमी कोमट तेलाने करा-
केसांना तेल लावण्यासाठी नेहमी कोमट तेलाचा वापर करावा. केसांना तेल नेहमी रात्री लावा आणि सकाळी केसांना शॅम्पूने धुऊन घ्या. 
 
4 केसांना घट्ट बांधू नका-
तेल लावल्यावर केसांना घट्ट बांधू नये.असं केल्याने केस कमकुवत होतात आणि तुटतात.