शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (18:10 IST)

आंघोळ करताना या चुका करू नका नुकसान होऊ शकत

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज आंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज आंघोळ केल्यानं शरीरात ऊर्जा येते आणि स्वच्छता राहते. दररोज आंघोळ केल्यानं बऱ्याच आजारांपासून वाचू शकतो.काही लोक आंघोळ करताना काही चुका करतात या मुळे त्यांच्या आरोग्यास नुकसान देखील होऊ शकत.चला तर मग जाणून घेऊ या की काय चुका करावयाचा नाही.
 
1 चुकीच्या साबणाची निवड-
आंघोळीच्या साबणात तेल आणि क्लिंझरचे गुणधर्म असावे. साबण सौम्य असावं. चुकीच्या साबणाची निवड केल्यानं त्वचेशी निगडित आजार होऊ शकतात. 
 
2 वापरण्याचे टॉवेल वेळोवेळी धुवावे-
दररोज आंघोळी नंतर टॉवेल उन्हात वाळत घाला.वेळोवेळी टॉवेल धुवावे. ओलसर टॉवेल कधीही वापरू नये.आठवड्यातून किमान एकदा तरी टॉवेल धुवावे.त्वचेचे संसर्ग होऊ शकतात.
 
3 लूफाची स्वच्छता नियमाने करावी-
बॉडी स्क्रब म्हणून लूफा वापरणे चांगले असते. आठवड्यातून किमान एकदा तरी लूफा स्वच्छ करा. दर तीन आठवड्यानंतर लूफा बदलावे.   
 
4 स्नानगृहाचा पंखा बंद करू नका-
अंघोळीच्या वेळी किंवा आंघोळ झाल्यावर स्नानगृहातील पंखा काही वेळासाठी सुरू करा. असं केल्याने बाथरूम किंवा स्नानगृहातील ओलसरपणा कमी होईल आणि पंखा बंद असल्यावर ओलसरपणामुळे भिंती खराब होण्यास सुरुवात होईल. 
 
5 अधिक गरम पाणी घेऊ नका -
हिवाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करतात, परंतु अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्यावर नुकसान होऊ शकत. जास्त गरम पाणी घेऊन आपल्याला त्वचेचे संसर्ग होऊ शकते. त्वचाही काळपटते.
 
6 केसांना दररोज शॅम्पू करू नका-
केसांमध्ये दररोज शॅम्पू केल्यानं केसांना नुकसान होऊ शकत. केस त्वरित धुऊ नका. असं केल्यानं केस रुक्ष आणि निर्जीव होतात. 
 
7 आंघोळी नंतर मॉइश्चरायझर लावा-
  त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी आंघोळी नंतर त्वरितच मॉइश्चरायझर वापरा. काही काळ गेल्यावर मॉइश्चरायझर लावल्यानं त्याचा काहीच फायदा  होत नाही. 
 
8 या ठिकाणी साबणाचा वापर करू नका-
शरीराच्या काही भागात साबणाचा वापर कमी प्रमाणात करावा. काखेत,कंबरेवर आणि चेहऱ्यावर कमीत कमी साबण लावा. खाजगी भागांवर देखील साबण लावणे टाळा.
 
9 जखमांना झाकू नका-
जर आपल्या शरीरावर काही जखमा झाल्या असतील तर त्या झाकू नका. किरकोळ जखमा आंघोळ करताना उघडून ठेवा. जखमेवर आंघोळ झाल्यावर जखम पुसून त्यावर नवीन पट्टी लावा.