रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (14:18 IST)

आयुर्वेदिक उटणे, घरच्या घरी सौंदर्या उजळवा

beauty tips
त्वचेला श्वास घ्यायला मिळाल्यावर ती आपोआप खुलुन दिसते. म्हणनू बाजारातील कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी घरच्या घरी आयुर्वेदिक लेप तयार करा व निरोगी त्वचा मिळवा.
 
सामुग्री- 2 चमचे बेसन, अर्धा लहान चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर कापुर, मिसळण्यासाठी पाणी, गुलाब पाणी किंवा दूध.
 
बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापुर हे एकत्र करुन यात आपल्या सवलतीप्रमाणे पाणी, दूध किंवा गुलाब पाणी घालून लेप तयार करावा. हा लेप एकसारखा चेहर्‍यावर व मानेवर लावावा. कापसाच्या दोन पट्ट्या गुलाब पाण्यात भिजवून आ‍ि मग घट्ट पिळून डोळ्यांवर ठेवाव्या. 20 मिनिटानंतर पाण्याने धुवावा. तुमचा अनुभव आणखी चांगल्या परिणामांसाठी कापसाच्या दोन पट्ट्या गुलाबपाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. हा तजेलदार त्वचा मिळविण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. तसेच मानसिक शांती अनुविण्यासाठी लेप लावताना कमी प्रकाशाच्या खोलीत मधुर संगीत लावून लेटल्याने फ्रेश जाणवेल.