1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)

काही सोप्या ब्युटी टिप्स

marathi beauty tips
सुंदर दिसण्यासाठी  दररोज काही योजना आखावी म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, तेव्हाच आपली त्वचा निरोगी राहील आणि आपण सुंदर दिसाल. या साठी काही ब्युटी टिप्स अवलंबवा. 
 
क्लिंझिंग -
त्वचेवर धूळ माती घाण आणि घाम आल्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. त्वचेच्या संरक्षणासाठी फेसवॉश वापरावे. या मुळे बंद झालेले छिद्र उघडतात. त्वचा मोकळ्या पणाने श्वास घेते आणि निरोगी राहते. 
 
1 दररोज दिवसातून दोन वेळा फेसवॉश ने चेहरा स्वच्छ धुवा, सकाळी अंघोळीच्या वेळी आणि संध्याकाळी बाहेरून आल्या वर. असं केल्याने  छिद्र उघडतात. 
 
2 फेस वॉश ची निवड त्वचेप्रमाणे असावी. 
 
3 चेहऱ्याची त्वचा कोरडी आहे तर मिल्क,क्रीम किंवा ऑइल बेस्ड फेसवॉश वापरा. आणि त्यात पीएच ची पातळी देखील तपासून बघा.
 
4 तेलकट त्वचा असल्यास जेल असलेले फेसवॉश वापरा आणि तपासून बघा की ह्या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे किंवा नाही.
 
5 अंघोळीला सामान्य साबणाऐवजी ट्रान्स्परंट जेल वापरा. साबणाने त्वचा कोरडी पडते. परंतु जेल वापरल्याने त्वचा  मऊ होते. 
 
6 चेहऱ्यावर दोन वेळाच फेसवॉश लावा.त्यापेक्षा अधिक वेळा लावू नका. या मुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते.