चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात प्रभावी नारळाचं तेल  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  सुरकुत्या कोणत्याही महिलेच्या वाईट स्वप्ना सारख्या असतात. सुरकुत्या  सौंदर्य नष्ट करतात आणि वृद्धत्व दर्शवतात. सरत्या वयात त्वचेशी निगडित समस्या उद्भवू लागतात. यामध्ये सुरकुत्या येणं सर्वात जास्त त्रासदायक असतात. परंतु या साठी आपल्याला कोणत्याही महागड्या उत्पादक वापरण्याची काहीही गरज नाही. कारण आमच्या कडे या समस्येसाठी एक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे नारळाचं तेल.  ज्यामुळे आपण सुरकुत्या दूर करू शकता.
				  													
						
																							
									  
	 
	प्राचीन काळापासून नारळाच्या तेलाचा वापर आरोग्य संबंधी समस्यांसह त्वचेच्या समस्यांना दूर करण्यात मदत करतो. या शिवाय नारळाचं तेल केसांच्या समस्येला दूर करतो आज आम्ही आपल्याला नारळाच्या तेलाचं काही वैशिष्टये सांगत आहोत. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. 
				  				  
	 
	सुरकुत्यादूर करण्यासाठी वर्जिन नारळाचं तेल निवडा. या साठी आपल्या चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. टॉवेल ने स्वच्छ करून नारळाच्या तेलाच्या काही थेंबा चेहऱ्यावर लावून 5 ते 10 मिनिटे सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी लावून रात्रभर तसेच ठेवा. नारळ फ्री रॅडिकल्स दूर करत जे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात. नारळाचं तेल सुरकुत्या दूर करण्यात मदत करतो.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	* नारळतेल आणि एरंडेल तेल- नारळाच्या तेलासह एरंडेल तेलाचा वापर करून त्वचा तजेल आणि तरुण दिसते.नारळाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब  एरंडेल तेलात मिसळून चेहऱ्याला सर्क्युलेशन मोशन मध्ये मसाज करा. त्वचा हे तेल शोषून घेण्यासाठी तास भर तेल असेच लावून ठेवा. आपण हे उपाय दररोज देखील करू शकता. 
				  																								
											
									  
	 
	* नारळाचं तेल आणि मध - अँटी ऑक्सीडेंटने समृद्ध मध आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे आपल्या त्वचेला आतून सुधारते आणि नैसर्गिकरीत्या चकचकीत करते. नारळाच्या तेलासह मध लावल्याने हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करत. यासाठी आपण हे तेल सुरकुत्या असलेल्या जागी लावा आणि तासभर तसेच ठेवा नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. आपण हा उपाय दररोज करू शकता.
				  																	
									  
	 
	* नारळ तेल आणि ऍपल साइडर व्हिनेगर- हे ऍपल साइडर व्हिनेगर आपल्या त्वचेसाठी आस्ट्रिजन्ट म्हणून काम करत आणि त्वचेच्या पीएच पातळीला बॅलन्स करतो. जुन्या पेशींना स्वच्छ करून नवीन पेशी वाढवतो. या साठी ऍपल साइडर व्हिनेगर मध्ये थोडंसं पाणी मिसळा आणि कापसाने चेहरा आणि मान स्वच्छ करा. नंतर रात्री झोपताना नारळाच्या तेलाच्या काही थेंबांनी चेहऱ्याची मॉलिश करा सकाळी चेहरा पाण्याने धुऊन घ्या. काही दिवसातच  फरक दिसेल.     
				  																	
									  
	 
	* नारळाचं तेल आणि हळद- हळद आपल्या त्वचेसाठी खूप चांगली मानली जाते. हे सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत करत थोड्या  नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. या मुळे सुरकुत्या दूर होतील. हे संयोजन वाढत्या वयाच्या चिन्हांना दूर करण्यात मदत करतो.
				  																	
									  
	 
	नारळाचं तेल त्वचे साठी चांगलं असतं. हे आपल्या त्वचेला हायड्रेट करत आणि सेगिंग होण्यापासून वाचवते. या मध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असतात जे नवीन त्वचेच्या पेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करतात. चला तर मग सुरकुत्यांपासून आपल्या त्वचेला वाचवू या आणि  नारळाच्या तेलाला आपल्या स्किन केयर चा भाग बनवू या.