हिवाळ्यात केस का गळतात, जाणून घेऊ या
हिवाळ्याच्या हंगामात आपले केस जास्त गळतात तर आज आम्ही आपल्याला ह्याच्या कारणा बद्दल आणि त्याच्या पासून मुक्त कसं राहावं जाणून घेऊ या.
हिवाळ्याच्या हंगामात त्वचाच नाही तर केस देखील कोरडे पडतात. अशा परिस्थितीत केसांना आवश्यकता आहे पुरेशा पोषणाची आणि काळजी घेण्याची जेणे करून ते बळकट होतील.चला तर मग जाणून घेऊ या केस गळतीची कारणे आणि 5 प्रभावी उपाय
कारणे -
पौष्टिक घटकांची कमतरता केसांच्या गळतीचे प्रमुख कारण आहे. परंतु या व्यतिरिक्त काही इतर कारणे देखील आहे. जे केसांच्या गळतीची कारणीभूत आहे.
* तणाव
* अशक्तपणा
*केसांवर प्रयोग .
* व्हिटॅमिन बी ची कमतरता
* प्रथिनांची कमतरता.
* हायपो थायराईडीझम
* कोंडा
* बोरिंगच्या पाण्याने केस धुणं
* अनुवांशिक
* केसांच्या मुळात संसर्ग
केसांना गाळण्यापासून वाचविण्यासाठी ह्याची कारणे ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊ या अशे 5 उपचार आहे जे केसांच्या गळती ला रोखण्यात फायदेशीर आहे.
1 नारळ- केसांना पोषण देण्यासाठी नारळ प्रत्येक रूपात प्रभावी आहे. नारळ तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज करा.या मुळे मुळाला पोषण मिळत. ह्याला किमान 1 तास तरी केसांना लावून ठेवा. या शिवाय नारळाचं दूध केसांना लावून मसाज करून 1 तासानं केस धुतल्याने फायदा मिळतो.
2 जासवंद - जास्वनंदाचे फुल केसांसाठी वरदानपेक्षा कमी नाही. जास्वंदाची फुले वाटून नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावा. आणि अर्धा तास केसांना लावून ठेवा नंतर केस धुवून घ्या. असं केल्यानं केसांना कोंड्यापासून सुटका मिळते आणि केस बळकट आणि चमकदार बनतात.
3 अंडी -अंडी प्रथिनांनी समृद्ध आहे, या मध्ये झिंक, खनिजे आणि सल्फर देखील मुबलक प्रमाणात आढळते. हे सर्व पोषक घटकांना मिळवून केसांना बळकट करतात. आणि केसांची गळती रोखतात.. अंड्याचे पांढरे भाग ऑलिव्ह तेलात मिसळून लावल्यानं चांगल्या प्रकारे मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
4 कांदा - कांद्याचा रस लावल्यानं केसांची गळती कमी होते आणि केस नवीन येतात. आणि लांबी वाढते. आठवड्यातून किमान दोनदा कांद्याचा रस लावल्यानं अर्धा तासानंतर शॅम्पू करा. हे खूप प्रभावी उपाय आहे.
5 लसूण - या मध्ये सल्फर जास्त प्रमाणात असत. या मुळे हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याला नारळाच्या तेलात शिजवून लावा किंवा ह्याचे रस नारळाच्या तेलात मिसळून लावल्यानं फायदा होतो.