1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (20:20 IST)

कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी 3 सोपे घरगुती टिप्स

3 easy home beauty tips for dark circles on the forehead
हवामान कोणतेही असो त्वचेला सूर्याच्या यूव्ही किरणांपासून त्वचेच्या संरक्षणाची गरज आहे.टॅनिग होण्याचे प्रमुख कारण केवळ सूर्याच्या यूव्ही किरणाचं नाही. बऱ्याचदा टॅनिग डिहायड्रेशनमुळे किंवा बल्ब  आणि ट्यूबलाईट्स मुळे देखील होतं.
 या साठी चांगले आहे की आपण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार दर तीन तासानंतर चेहरा स्वच्छ करून सनस्क्रीन वापरा.परंतु बऱ्याचवेळा टॅनिंग मुळे त्वचा इतकी काळपटते की सामान्य सनस्क्रीन लावल्याने देखील बरी होतं नाही. विशेषतः मानेवर आणि कपाळावरील टॅनिग झालेली सहजपणे लवकर जात नाही. या साठी आज आम्ही आपल्याला कपाळावरील टॅनिग दूर करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सांगत आहोत ज्यांचा वापर करून आपण कपाळावरील काळपटपणा देखील सहजरीत्या दूर करू शकता.  
 
1  हरभराडाळीचे पीठ आणि हळद-
 
साहित्य-
1 लहान चमचा हरभराडाळीचे पीठ,1 लहान चमचा हळद, 1 मोठा चमचा गुलाब पाणी 
 
कृती- 
सर्वप्रथम एका पात्रात हरभरा डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद आणि गुलाबपाणी मिसळा आणि ह्याची पेस्ट बनवून कपाळी लावा. कपाळावर ही पेस्ट बोटांच्या साहाय्याने सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत हळुवार लावा. हे कपाळावर हळुवार हाताने घासा आणि उटण्याप्रमाणे काढून घ्या. टॅनिग जास्त प्रमाणात असेल तर असं नियमितपणे दिवसातून एका वेळा करा. टॅनिग कमी झाल्यावर आठवड्यातून 2-3 वेळा नक्की करा. 
 
2 चंदन आणि नारळाचे पाणी -
 
साहित्य 
1 लहान चमचा चंदन, 1 लहान चमचा नारळाचं पाणी,चिमूटभर हळद.
 
कृती- 
एका पात्रात चंदन ,नारळपाणी आणि हळद मिसळा. ही पेस्ट कपाळावर लावा.20 ते 30 मिनिटे ही पेस्ट तशीच लावून ठेवा. पेस्ट वाळल्यावर कपाळाला पाण्याने धुऊन घ्या. आपली इच्छा असल्यास ही पेस्ट पूर्ण चेहऱ्यावर देखील लावू शकता. ही पेस्ट दररोज कपाळावर लावा.असं केल्याने काहीच दिवसात काळपटपणा हलकं होण्यास सुरुवात होईल.
 
3 ओट्स आणि ताक-
साहित्य-
2 लहान चमचे ओट्स,2 लहान चमचे ताक,चिमूटभर हळद. 
 
कृती -
सर्वप्रथम ओट्स दळून त्याची भुकटी बनवा. एका पात्रात ताक,ओट्सची भुकटी आणि हळद घालून चांगल्या प्रकारे मिसळा आणि कपाळावर स्क्रब करा. असं केल्याने कपाळावरील काळपटपणा दूर होईल. आपण ही पेस्ट दररोज देखील वापरू शकता आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही पेस्ट लावू शकता.
 
हे काही घरगुती आणि सोपे उपाय केल्याने कपाळावरील काळपटपणा दूर होऊन त्वचा तजेल दिसेल.