गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (11:30 IST)

आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय केल्यानं त्वचा उजळेल

home remedies for glowing skin
कधी कधी वेळेअभावी आपण पार्लर मध्ये जाऊ शकत नाही आणि तसेच पार्लरचा महागडा खर्च देखील परवडत नाही. तर यासाठी काळजी नसावी . आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगत आहोत की ज्यामुळे आपले पैसे देखील जास्त खर्च होणार नाही आणि त्वचा देखील चांगली होऊन आपले सौंदर्य टिकून राहील. 
 
* डागांसाठी बदाम- 
चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्यांपासून मुक्त होण्यासाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे. या साठी बदाम वाटून त्यामध्ये 1 चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळा. हे चेहऱ्यावर लावून काही वेळ ठेवा नंतर चेहरा धुऊन घ्या. असं केल्यानं चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या नाहीसे  होतील आणि चेहऱ्याचा रंग तसाच राहील.
 
* गुलाबाने तजेलता मिळवा - 
  गुलाबाच्या फुलाला वाटून त्यामध्ये दूध मिसळून चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा.  नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. आपण आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे पॅक लावू शकता. या मुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघेल आणि त्वचा उजळेल.
 
* ओटमील स्क्रब- 
ओटमील, मध आणि दूध मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करा 15 मिनिटे स्क्रब केल्यावर पाण्याने स्वच्छ करून घ्या. हे बाजारपेठेत मिळणाऱ्या एखाद्या महागड्या स्क्रबपेक्षा देखील चांगले परिणाम देईल. 
 
* हळद- 
नितळ आणि गोरी त्वचा मिळविण्यासाठी हळदीमध्ये हरभराडाळीचे पीठ किंवा गव्हाचं पीठ मिसळून लावा. या शिवाय आपण हळदीमध्ये ताजी साय,दूध आणि गव्हाचं पीठ मिसळून लावू शकता. हे लावून 10 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. 
 
* मध आणि गुलाबपाणी- 
जर आपली त्वचा कोरडी आहे तर मध आणि गुलाबपाणी मिसळून 15 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा नंतर पाण्याने धुऊन घ्या. यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो आणि त्वचा कोरडी आणि रुक्ष होत नाही. आपण आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे पॅक वापरू शकता. 
 
* टोमॅटो- 
1 टोमॅटो आणि 2 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वाळू द्या नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.  हे अंघोळीच्या पूर्वी दर दोन दिवसानंतर वापरा. टोमॅटोमध्ये लायकोपिन आढळत, जे चेहऱ्यावरील रंग उजळतो आणि टॅनिग कमी करतो. 
* ग्रीन टी-
सर्वप्रथम 2 बॅग ग्रीन टी पाण्यात चांगल्या प्रकारे बुडवा आणि त्यामधील पावडर काढून घ्या. यामध्ये 1 टी स्पून लिंबाचा रस, 1 टी स्पून मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे वाळू द्या नंतर पाण्याने धुऊन घ्या. ह्या पॅकमुळे त्वचेचा रंग उजळेल.