शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

वयाच्या 40 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी या टिप्स अवलंबवा

सरत्या वयात आपल्या त्वचेमध्ये आणि शरीरात बरेच बदल होतात. या काळात आपल्या आरोग्यासह त्वचेची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. जेणे करून आपली त्वचा तरुण आणि तजेल दिसावी. या साठी आपण बऱ्याच प्रकारचे सौंदर्यवर्धक टिप्स अवलंबवू शकता. चला जाणून घेऊ काही टिप्स बद्दल.   
 
1 त्वचेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करा-
वय वाढण्यासह महत्त्वाचे आहे की दररोज सकाळी आपल्या त्वचेला स्वच्छ करावं. या साठी आपण सौम्य साबणाचा वापर करू शकता.
 
2 क्लिन्झरचा वापर- 
त्वचेसाठी एक चांगल्या आणि सौम्य क्लिन्झर चा वापर करावा, आणि अशा प्रकारचे स्किन केयर उत्पादक वापरू नका ज्यामुळे आपल्या त्वचेला काही नुकसान होईल. या शिवाय सरत्या वयात नेहमी स्किन केयर उत्पादकआणि क्लिन्झर वापरा जे ऑइल फ्री असतील, विशेषतः जेव्हा आपली त्वचा एक्ने प्रो किंवा मुरुमाची आहे.  
 
3 सनस्क्रीनचा वापर- 
दररोज सकाळी आपल्या त्वचेवर  SPF-15 पेक्षा अधिक असणारे सनस्क्रीन वापरा, मग ते लाइट वेट असो किंवा हेवी ड्यूटी फॉर्म्युलेशन असो. कोणत्याही प्रकारच्या मेकअप करण्यापूर्वी सनस्क्रीन आवर्जून लावा.  
 
4 मेकअप स्वच्छ करून झोपा-
रात्री झोपण्यापूर्वी नेहमी मेकअप काढून झोपा जेणे करून दिवसभर थकलेली त्वचा मोकळ्या पणाने श्वास घेऊ शकेल. मेकअप लावून झोपल्यानं आपल्या त्वचेचे छिद्र बंद होतात. या मुळे त्वचेवर सुरकुत्या आणि  इतर त्रास उद्भवू शकतात.
 
5 चांगला आहार घ्या- 
नेहमी तरुण आणि तजेल दिसण्यासाठी चांगला आहार घ्यावा. हे त्वचेला इतर प्रकारचे प्रथिने आणि व्हिटॅमिन्स देतात ज्यामुळे त्वचा चकाकते आणि सुरकुत्या होण्याची शक्यता कमी होते. या साठी आपल्या आहारात प्रथिनेयुक्त आहार समाविष्ट करा.  
 
6 पुरेसं पाणी पिणं -
आपल्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. या मुळे त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचा चकचकीत आणि तरुण दिसते. म्हणून दररोज किमान 8 ग्लास पाणी अवश्य प्यावं.
 
हे उपाय अवलंबवून आपण आपल्या त्वचेला तरुण आणि तजेल करू शकता. या शिवाय त्वचेच्या समस्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन अँटी एजिंग क्रीम लावू शकता, सुरकुत्या रोखण्यासाठी बोटॉक्स, केमिकल पिल्स आणि लेझर सारख्या मॉर्डन ट्रीटमेण्ट वापरू शकता. पिगमेंटेशन आणि ब्लॅक हेड्स रोखण्यासाठी अल्फा हायड्रॉक्सी ट्रीटमेण्ट वापरा. हे टिप्स अवलंबवून आपण वयाच्या 40 व्या वर्षी अधिक तरुण आणि तजेल दिसू शकता.