चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी या गोष्टी वापरा
चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बरेच उपाय केले जाते. लोक ब्यूटीपार्लर मध्ये जातात महागडे उत्पादक वापरतात फेशियल करतात. हे सर्व करून देखील काही ही उपयोग होत नाही. आज आम्ही आपल्याला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्या मुळे चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहील. चला तर मग जाणून घेऊ या.
1 कोरफड-
चेहऱ्यावरील सौंदर्य वाढविण्यासाठी सर्वप्रथम कोरफड आपली मदत करेल. कोरफड किंवा कोरफड जेल आपल्या चेहऱ्याला बरेच फायदे देऊ शकतात. चेहऱ्यावरील डाग, पुटकुळ्या, पुरळ, डोळ्यांच्या खाली झालेले काळे वर्तुळ हे सर्व काढण्यासाठी कोरफड मदत करते. या साठी आपल्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावायचे आहे. नंतर कोमट पाण्याने आपल्या चेहऱ्याला धुऊन घ्या. असं नियमितपणे केल्याने फायदा मिळतो.
2 साय किंवा मलई -
काही लोक साय खाण्याची आवड ठेवतात. काही ब्रेडला किंवा पोळीला साय लावून खातात, ही साय खाण्यात चविष्ट असते. ही साय चेहऱ्याला तजेल करण्याचे काम देखील करते. या साठी आपल्याला सायीमध्ये चिमूटभर हळद आणि थोडस गुलाब पाणी मिसळायचे आहे नंतर चेहऱ्यावर लावायचे आहे. लावल्याच्या 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे. असं दररोज केल्याने चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात.
3 लिंबू-
लिंबूमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि एस्कॉर्बिक ऍसिड आढळतात, जे चेहऱ्याला चकचकीत बनविण्यास मदत करतात. चेहऱ्यावर लिंबाचा रस लावून थोड्या वेळाने पाण्याने धुऊन घ्या. या शिवाय मध देखील चेहऱ्याला चकाकी देण्याचे काम करतो. या साठी मधात ऑलिव्ह तेल मिसळून त्वचेवर लावायचे आहे. या मुळे चेहऱ्यावरील रुक्षपणा नाहीसा होईल आणि चेहऱ्यावर नवी चमक आणि तजेलपणा दिसण्यात मदत होईल.
4 टोमॅटो -
कोणत्याही भाजीची चव वाढविण्यासाठी टोमॅटो महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच प्रमाणे टोमॅटो आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यात देखील मदत करतो. या साठी आपल्याला टोमॅटो मधून कापायचा आहे. नंतर हे दोन्ही हाताने चेहऱ्यावर घासून लावायचे आहे. 10 -15 मिनिटे असं करून स्वच्छ पाण्याने चेहऱ्याला धुऊन घ्या. टोमॅटो मधील अँटीऑक्सीडेंट गुणधर्म त्वचेला पोषण देण्याचे काम करतो. म्हणून टोमॅटो चेहऱ्यासाठी फायदेशीर मानला जातो.