शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (17:15 IST)

केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी हरभराच्या डाळीच्या पिठाने बनलेले हेयर मास्क वापरा

केसांच्या सुंदरतेला वाढविण्यासाठी हरभराडाळीचे पीठ वापरतात हे केसांच्या सर्व समस्या जसे की कोंडा होणं,केसांची गळती या पासून सुटका मिळतो. चला तर मग हरभराडाळीच्या पिठाचा कसा वापर करता येईल हे जाणून घेऊ या. 

1 हेयर क्लिन्झर प्रमाणे- 
हरभराडाळीचे पीठ केसांसाठी एका क्लिन्झर प्रमाणे काम करते. या मुळे केसांची चांगल्या प्रकारे स्वच्छता होते. तसेच केसांना कोणत्याही प्रकाराचे नुकसान होत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे.
 
साहित्य-
हरभराडाळीचे पीठ 1 कप,पाणी गरजेप्रमाणे.
 
कृती -
पाणी आणि हरभराडाळीचे पीठ मिसळून दाटपेस्ट बनवा.हे तो पर्यंत मिसळा जो पर्यंत हे चांगले मिक्स होत नाही. या मध्ये गोळे नसावे. अन्यथा हे केसांना नुकसान देऊ शकत.
 
कसं वापरावं - 
हे पेस्ट केसांमध्ये चांगल्या प्रकारे लावून घ्या. किमान 10 मिनिटे तरी केसांना लावून ठेवा.केस चकचकीत, मऊ आणि स्वच्छ होतात.
 
2 केसांच्या वाढीसाठी -
हरभराडाळीचे पीठ हे नैसर्गिक उत्पादन आहे. हे केसांना पोषण देण्याचे काम करत. या मुळे केसांची चांगली वाढ होते. केसांच्या पूर्ण वाढीसाठी हरभराडाळीचे पीठ वापरणे चांगले आहे. 

3 केसांच्या पूर्णपणे वाढीसाठी हेयरपॅक-
साहित्य-
हरभराडाळीचे पीठ 1 कप, दही 1 कप,हळद 1 चमचा.
 
कृती - 
एका भांड्यात सर्व साहित्य घेऊन चांगल्या प्रकारे मिसळा. हे पेस्ट तसेच ठेवा. जेणे करून सर्व साहित्य एकसर होतील. दही दोनतोंडी केसांसाठी चांगले आहे या मध्ये अँटीऑक्सीडेन्ट आणि फायदेशीर बेक्टेरिया असतात जे केसांच्या मुळा बळकट करतात. 
 
कसं वापरावं- 
पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर संपूर्ण केसांना लावून घ्या.केसांच्या मुळात आवर्जून लावा.तसेच केसांच्या टोकापर्यंत देखील चांगल्या प्रकारे लावून केसांमध्ये शॉवर कॅप लावून घ्या. 30 मिनिटे तसेच ठेवून मिश्रण वाळल्यावर केसांना कोमटपाण्याने धुऊन घ्या. या मुळे केस चमकदार होतात. 
 
4 केसांच्या गळतीवर नियंत्रणासाठी -
हरभराडाळीचे पीठ केवळ केसांच्या वाढीसाठीच नव्हे तर केसांना गळण्यापासून देखील रोखण्याचे काम करतो. या साठी आपण हरभराडाळीच्या पिठासह ऑलिव्ह तेल मिसळून सहजपणे हेयर मास्क तयार करू शकता .ऑलिव्ह तेल हे केसांसाठी खूप फायदेशीर आणि प्रभावी देखील आहे. हे केसांची गळती थांबवते.
 
साहित्य-
बेसन 1 कप, दही 1 कप, ऑलिव्ह तेल 2 चमचे,
 
कृती- 
एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ घ्या या मध्ये दही मिसळून चांगल्या प्रकारे फेणून घ्या.या मध्ये 2 चमचे ऑलिव्ह तेल घाला.हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेणून घ्या.
 
कसं वापरावं- 
हरभराडाळीचे पीठ आणि ऑलिव्ह तेलाचे हे मिश्रण केसांच्या मुळात लावून द्या. काही वेळ तसेच राहू द्या. पूर्ण वाळू देऊ नका. या पूर्वीच केसांना कोमटपाण्याने धुऊन घ्या. 
 
5 निरोगी आणि लांब केसांसाठी -
केसांना लांब आणि निरोगी ठेवण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ आणि अंडी वापरू शकता. अंडीमध्ये असलेले प्रथिन घटक केसांना निरोगी ठेवण्याचे काम करतात. तसेच केसांची चमक देखील वाढते. 
 
साहित्य- 
हरभराडाळीचे पीठ  1 कप, 2  अंडी केसांच्या लांबीच्या अनुसार घ्या. 
 
कृती- 
हे हेयर पॅक बनविण्यासाठी हरभराडाळीचे पीठ आणि अंडी फोडून एका भांड्यात एकत्र करा आणि मिक्स करून पेस्ट तयार करा.
 
कसं वापरावं-
हे हेयर पॅक केसांच्या मुळात आणि टोकावर लावून एकसारखे करा.लावल्यावर काही वेळ वाळू द्या.नंतर केसांना कोमट पाण्याने धुऊन घ्या. अंडी एका कंडिशनर प्रमाणे काम करत या मुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
केसांशी निगडित कोणतीही समस्यांसाठी हरभराडाळीचे पीठ वापरा असं केल्यानं केस नैसर्गिकरीत्या निरोगी आणि चमकदार होतात.