शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (21:49 IST)

लिपस्टिक च्या रंगात मुलींचा मूड लपलेला आहे

लिपस्टिक लावणे आणि मेकअप करणे प्रत्येक मुली ला आवडते. परंतु बऱ्याच वेळा आपण लक्ष दिले असेल की काही मुलींना काही खास रंगाच्या लिपस्टिक जास्त आवडतात. मग ती लाल रंगाची असो, किंवा गुलाबी रंगाची. या लिपस्टिक च्या रंगांना बघून कोणी ही त्यांची मन:स्थिती किंवा मूड कसे आहे सांगू शकत नाही. विशेष करून जर आपण प्रियकर आहात किंवा पती आहात तर आपल्याला आश्चर्य होईल. चला जाणून घेऊ या की लिपस्टिक चा रंग मुलींच्या मूड बद्दल काय सांगतो.  
 
1 लाल रंग- 
या रंगाचा वापर करणारी किंवा या रंगाची लिपस्टिक आवडणारी स्त्री आत्मविश्वासी, तीक्ष्ण बुद्धीची आणि मन मोकळ्या असतात. ह्यांना लोकांच्या मध्ये आकर्षणाचे केंद्र राहण्यास आवडते. स्वभावाने या खूप धाडसी आणि उत्साही असतात.
 
2 वाइन रंग-
या रंगाच्या लिपस्टिकची आवड ठेवणाऱ्या बायका खूप बिंदास असतात. अशा स्त्रिया लोकांचे लक्ष वेधण्यास सक्षम असतात. ह्यांना मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आवडतात.
 
3 न्यूड रंग-
या रंगाचे लिपस्टिक वापरणाऱ्या स्त्रिया खूप सरळ असतात. प्रत्येक गोष्टींबद्दल त्यांचे स्पष्ट मत असतात.त्यांचे असे मत आहे की कमी गोष्टींमध्ये देखील सौंदर्य आहे. या स्वभावाने शांत आणि सौम्य असतात.    
 
4 गुलाबी रंग -
सहसा असे म्हटले जाते की गुलाबी रंग हा स्त्रियांना खूप आवडतो. ज्या बायकांच्या आवडीचा रंग गुलाबी असतो त्या मनाच्या स्वच्छ असतात. ज्या मुलींना गुलाबी रंग आवडतो त्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहणाऱ्या आणि संवेदनशील असतात. अशा स्त्रिया आपल्या व्यवहाराने कोणाचे ही मन जिंकू शकतात.
 
5 प्लम किंवा तपकिरी रंग- 
प्लम किंवा तपकिरी रंगाच्या लिपस्टिक ची आवड ठेवणाऱ्या स्त्रिया कोणत्या ही गोष्टीने चटकन कंटाळतात. ह्यांना कोणत्याही परिस्थितीत आव्हाहन घ्यायला आवडत नाही. या शिवाय या खूप रहस्यमयी असतात.
 
6 नारंगी रंग-
नारंगी रंग आवडणाऱ्या स्त्रिया उग्र आणि उष्ण स्वभावाच्या असतात. उत्साह ह्यांच्या चेहऱ्यावरून दिसतो. अशा स्त्रिया आपल्या कामाबद्दल खूप गंभीर असतात.