रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (17:45 IST)

साजूक तुपात हे मिसळून लावा काळे ओठ गुलाबी होतील

काळे झाले ओठ साजूक तुपाच्या साहाय्याने गुलाबी करू शकतो. साजूक तूप वापरण्यापूर्वी आपल्याला हे मिसळावे लागणार.काही मिनिटे हे ओठांना लावल्यानं थंड हवेमुळे रुक्ष झालेले ओठ देखील काळे पडणार नाही आणि ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
या साठी आपण 1 चमचा साजूक तुपात चिमूटभर हळद घ्या. एक स्वच्छ वाटीत हे दोन्ही मिसळा. आता हे तूप ओठांना लावा.जर आपण हे मिश्रण रात्री लावत आहात तर रात्रभर तसेच सोडा. हे आपल्या ओठांवर लिपबाम प्रमाणे काम करत. जर हे लावल्यानं आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर थोडं कापूस घेऊन हळुवार हाताने ओठांवर जमलेली पापडी काढून घ्या.  
साजूक तुपाचा नियमित वापर केल्यानं ओठ गुलाबी होतात. हे आपल्या त्वचेच्या टोनला फिकट करण्यात देखील फायदेशीर आहे. जर आपले ओठ  लिपकलर आणि इतर दुसरे लिप उत्पादनांचा वापर करून  काळे पडले आहेत तर ही रेमेडी देखील या साठी प्रभावी आहे. हे केल्याने आपले ओठ मऊ आणि गुलाबी होतील. चला तर मग हे अवलंबवून बघा.