मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (21:02 IST)

काय सांगता, शॅम्पू मध्ये हे मिसळल्याने केसांची गळती थांबते

आजकालच्या चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे बहुतेक स्त्रिया केसांच्या गळतीच्या समस्येमुळे खूप काळजीत असतात. केसांची गळती थांबविण्यासाठी त्या बऱ्याच उत्पादकांना अवलंबवतात. बऱ्याच वेळा हे उत्पादक फायदाच्या ऐवजी नुकसान देतात. या साठी आम्ही एक उपाय सांगत आहोत. बरेच कमी लोकांना हे माहीत नाही कडुलिंबाचा वापर करून आपण केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. या शिवाय हे केसांना काळेभोर आणि दाट करण्याचे काम करतात.या साठी आपल्याला फक्त 10 ते 15 कडुलिंबाच्या पानाची गरज आहे. 
 
कसं वापरावं- 
सर्वप्रथम 10 -15 कडूलिंबाची पाने धुऊन  1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या. ह्या पाण्याला अर्ध म्हणजे 1 ग्लासाचा अर्धा ग्लास करा. हे थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी शॅम्पू मध्ये  मिसळून लावा.हे पाणी कमी प्रमाणातच घ्या.