केसांना निरोगी करण्यासाठी आपल्या आहारात हे समाविष्ट करा
केसांची काळजी घेतली नाही तर केस कमकुवत होतात. आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर आणि केसांवर पडतो. वाढते प्रदूषण आणि खराब जीवनशैली मुळे केसांची गळती होते. काळेभोर लांब आणि घनदाट केस असणे ही प्रत्येक बाईची इच्छा असते. जेवढी काळजी आपल्या आरोग्याची घ्यावी लागते तेवढीच काळजी केसांची देखील घ्यावी लागते. केसांची काळजी घेतली नाही तर केस रुक्ष, निस्तेज आणि दोन तोंडी होतात आणि केसात कोंडा होतो. महागड्या शॅम्पू आणि उत्पादन वापरल्यावर देखील काही परिणाम होत नाही. कारण हे वरून पोषण देतात पण आतून केसांना पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. या साठी आहार पौष्टिक असावा. या मुळे आपले केस चकचकीत, सुंदर घनदाट, लांब होतील. चला तर मग जाणून घेऊ या अशा आहाराबद्दल जे केसांसाठी चांगले आहे.
1 अक्रोड- हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे या मध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई आणि बायोटिन नावाचे प्रथिन आढळते, जे केसांना निरोगी ठेवण्यात मदत करते.
2 मटार- हिवाळ्यात मिळणारी ताजी मटार स्वादाने समृद्ध असतेच ही आरोग्यासाठी देखील चांगली असते. या मध्ये आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन बी आढळते जे केसांसाठी फायदेशीर आहे.
3 आंबट फळे- आंबट फळामध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध असते. आंबट फळे प्रतिकारक शक्ती बळकट करते. संत्री, द्राक्ष, लिंबू सारखे आंबट फळे नियमितपणे सेवन केल्यानं केस बळकट आणि चमकदार बनतात.
4 सूर्य फुलाचे बियाणं -सूर्य फुलाचे बियाणं आरोग्य आणि सुंदरतेसाठी वापरतात. सूर्यफुलाच्या बियाणांमध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे रक्त परिसंचरणाला वाढवते या मुळे केस चमकदार आणि लांब होतात.
5 ढोबळी मिरची - ढोबळी मिरची ज्याला शिमला मिरची म्हणतात व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते. ह्याच्या सेवनाने आयरनाची कमतरता दूर केली जाऊ शकते. या मध्ये अशे पोषक घटक आढळतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.