बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (08:40 IST)

काय सांगता, थंड पाण्याने चेहऱ्यावर तजेलपणा येतो

चेहऱ्याचे सौंदर्य त्वचेने समजते मुलींसाठी त्यांची त्वचा महत्वपूर्ण असते. त्या त्वचेला चांगली ठेवण्यासाठी  खूप काळजी घेतात आणि त्वचा सुंदर बनविण्यासाठी महागडे सौंदर्य उत्पादन वापरता. परंतु काही घरगुती उपाय  आहे ज्यांना अवलंबवून चेहऱ्यावर तजेलपणा मिळतो. थंड पाणी होय, थंड पाणी ह्याच्या ने चेहरा धुतल्याने बरेच फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* त्वचा उजळते -
थंड पाणी चेहऱ्याच्या त्वचेला ताजेतवान करतो. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुतल्यावर चेहऱ्यात तेज येतो. कारण सकाळी छिद्र उघडे  असतात आणि पाणी थेट चेहऱ्याच्या आत पर्यंत पोहोचतं आणि चेहऱ्यावर तजेलपणा येतो.
 
* त्वचेला सजीव करते-
चेहरा पाण्याने धुतल्यावर आळस दूर होतो तसेच हे पाणी त्वचेला सजीव करत. या मुळे आपण स्वतःला उर्जावान अनुभवता. थंड पाणी रक्त विसरणं वाढवते आणि या मुळे त्वचा नितळ दिसते.
 
* यूव्ही च्या दुष्प्रभावाला कमी करते-
सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या यूव्ही हानिकारक किरणांपासून सुटका मिळविण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुणे चांगली पद्धत आहे. हे त्वचेला घट्ट ठेवतो आणि त्या छिद्रांना वाचवतो जे हानिकारक यूव्ही किरणांनी उघडले आहे.
 
* सुरकुरत्या कमी करत-
चेहऱ्यावर बर्फ चोळल्याने सुरकुत्या कमी होतात. ही पद्धत त्वचेला तरुण बनवते.
 
* चेहऱ्यावरील सूज कमी करते-
सकाळी झोपून उठल्यावर चेहरा सुजलेला जाणवतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि चेहरा तजेल होतो.
 
* त्वचेला घट्ट करते- 
त्वचेमध्ये समस्या तेव्हा येते जेव्हा त्वचेचे छिद्र उघडे असतात. थंड पाणी हे छिद्र बंद करून त्वचा घट्ट करते. या मुळे त्वचा तजेल दिसते.