शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:34 IST)

होम स्क्रब ने मऊ आणि सुदंर पाय बनवा

सर्व जण त्वचेची आणि केसांची निगा राखतो, त्यासाठी पूर्ण काळजी घेतो, परंतु पायांकडे किती लक्ष दिले जाते ह्याचा विचार कोणीही करत नाही. जेवढी काळजी त्वचेची आणि केसांची घ्यावयाची असते तेवढीच काळजी पायांची देखील घ्यावयाची आहे.
आपले पाय कोरडे असल्यास त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी जास्त असते. चला काही घरगुती स्क्रब बद्दल जाणून घेऊ या ज्यांचा वापर करून आपण मऊ आणि सुंदर पाय अवलंबवू शकता.  
 
1 साखर आणि लिंबू स्क्रब -हे स्क्रब तयार करण्यासाठी 1 वाटी मध्ये 2 चमचे साखर घ्या. या मध्ये अर्धा लिंबाचा रस मिसळा. चांगल्या प्रकारे, मिक्स करून आपल्या पायांना स्क्रब करा. ह्याचा वापर केल्यानं पायाची टॅनिंग देखील दूर होईल.
 
2 बेबी ऑइल आणि मिठाचे स्क्रब-  हे स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे बेबी ऑइल घेऊन या मध्ये 1 चमचा मीठ मिसळा. या पेस्टने आपले पाय स्क्रब करा. काही वेळ पायांना गरम पाण्यात बुडवून ठेवा, नंतर हळुवार हाताने पूर्ण पायांना स्क्रब लावा, नंतर स्वच्छ पाण्याने पायाला स्वच्छ करा.
 
3 मध आणि कापूर स्क्रब- हे स्क्रब करण्यासाठी 2 कापराच्या गोळ्या घ्या आणि चांगल्या प्रकारे मिसळून आपल्या पायावर लावून चांगल्या प्रकारे स्क्रब करा. हे स्क्रब किमान 10 मिनिटे लावून सोडा नंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.