शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (22:32 IST)

काय सांगता flower therapy ने सौंदर्य वाढते

फुले जे वातावरणाला सुवासिक करतात .ह्यांच्या द्वारे आपण शारीरिक, मानसिक आणि सौंदर्याच्या अनेक समस्यांना सोडवू शकतो. हे शक्य आहे फुलांच्या थेरेपीद्वारे.चला तर मग जाणून घेऊ या कशा प्रकारे ह्याच्या ने समस्यांवर समाधान मिळवू शकतो.
 
1 गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळवून नियमितपणे प्यायल्यानं, बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो आणि या मुळे सौंदर्य उजळते. गुलाबाच्या पाकळ्या वाटून दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा तजेल होतो. ओठांना गुलाबी करण्यासाठी देखील ह्याचा वापर केला जातो. 
 
2 काही दिवसापर्यंत सूर्यफूल नारळाच्या तेलात मिसळून उन्हात ठेवा. हे तेल शरीराच्या मॉलिशसाठी वापरा.या मुळे त्वचेशी निगडित सर्व रोग नाहीसे होतात. 
 
3 दात दुखी किंवा हिरड्यांमध्ये सूज येत असल्यास जुईची पाने चावून, त्याचा रस तोंडात ठेवा आणि काही वेळा नंतर थुंकून द्या.असं केल्यानं दातांशी निगडित सर्व त्रास आणि आजार नाहीसे होतात.
 
4 जास्वंदाच्या लाल फुलांचा वापर मधुमेह आणि हृदयाच्या समस्येसाठी करतात.हे फुले वाटून खडीसाखरेसह खाल्ल्याने फायदे होतात. या शिवाय महिलांच्या मासिकपाळीच्या तक्रारी मध्ये देखील हे प्रभावी उपाय आहे. नारळाच्या तेलात हे फुल घालून ठेवल्याने ह्या तेलाचा वापर केसांना काळे ठेवण्यात आणि चमकदार करण्यासाठी केला जाऊ शकतो. 
 
5 तोंडात छाले झाले असल्यास किंवा तोंड सोलटले  असल्यास चमेलीच्या पानाचा वापर केला जातो.चमेलीची पाने चावल्याने तोंडातील छाले त्वरितच बरे होतात. या शिवाय सकाळी चमेलीची फुले डोळ्यांवर ठेवल्यानं डोळ्याची दृष्टी वाढते.
6  100 ग्रॅम झेंडूची फुले घेऊन त्यामधील बियाणं काढून. 100 ग्रॅम साखर आणि 500 मिली पाण्यासह शिजवा. ह्याचा वापर केल्यानं शरीरात ऊर्जा येते आणि ताजे तवाने अनुभवता.    
 
7 चाफा किंवा चंपा,चमेली आणि जुईची फुले नारळाच्या तेलात उकळवून ठेवा. या तेलाने शरीराची  मॉलिश करा.या मुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.तसेच हे तेल केसांना लावल्यानं केस काळे आणि मऊ होतात.