रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लावा ग्रीन कॉलेजन फेस पॅक, कसा बनवाल जाणून घ्या

Green Face pack
आज आम्ही तुम्हाला ग्रीन कॉलेजन पॅक कसा बनवा सांगणार आहोत तसेच याचे फायदे काय ते देखील जाणून घ्या. वाढत्या वयाचे परिणाम जर तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागले तर प्रेत्येकाला चिंता वाटते. असं कोलेजनाच्या कमी मुळे होते. कारण जसे जसे तुमचे वय वाढते तसे तसे कॉलेजन उत्पादन क्षमता कमी होते. याकरिता तुम्ही तुमच्या डाएटमध्ये कॉलेजन रिच फूड सहभागी करावे. तसेच तुम्ही चेहऱ्यासाठी ग्रीन कॉलेजन पॅक देखील वापरू शकतात. तर चला ग्रीन कॉलेजन पॅक कसा बनवावा जाणून घेऊ या. 
 
ग्रीन कॉलेजन पॅक
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला शेवग्याचे पाने घ्यायची आहे. यामध्ये एक चमचा दूध, मध घालून चांगल्या प्रकारे बारीक करावे. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून एका बाऊलमध्ये काढावे. यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घालावे. आता हे चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. 20 मिनिट लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा. मग चेहऱ्यावर मॉइश्चराइज लावावे. हा फेस पॅक नियमित लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik