1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Aloe vera gel
केसांना एलोवेरा जेल लावण्याचे अनेक फायदे आहे. एलोवेरा ही एक अशी वनस्पती आहे जी ओलावा प्रदान करते तसेच पटायटेक वातावरणात तुम्ही केसांना एलोवेरा जेल लावू शकतात. 
 
एलोवेरा जेल केसांच्या मुळांना खूप वेळ ओलावा प्रदान करते तसेच केसांचे मऊपणा वाढवते. एलोवेरा जेल मुळे केसांना चमक येते. तसेच केसांसंबंधित समस्या दूर होतात. केसांमध्ये एलोवेराचा उपयोग फार पूर्वी पासून होत आहे. अनेक लोकांना याचा फायदा झाला आहे. 
 
असा करा उपयोग- 
एलोवेरा केसांसाठी अनेक प्रकारे वापरला जातो. एलोवेरा सोलून त्यामधील गर काढन घ्यावा. व तो फेटून केसांवर लावावा. 
 
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर एलोवेरा ज्युसचा नक्कीच उपयोग करा. आठवड्यातून एकादा एलोवेरा ज्यूसने केस धूवावे. यामुळे केसांच्या मुळाशी ओलावा राहील. 
 
बाजारात एलोवेरा शॅंपू , कंडिशनर मिळतात. ज्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. एलोवेरा जेल आवळा, मोहरीचे तेल, नारळाचे तेल यामध्ये मिक्स करून लावू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik