बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केवळ एक वर्ष वापरायला हवी लिपस्टिक

महिलांच्या जीवनात मेकअपचे खूप महत्त्व असतं आणि यासाठी त्या वेगवेगळे कॉस्टेमेटिक प्रॉडक्ट्स वापरत असतात. तसे तर प्रत्येक प्रॉडक्टवर एक्सपायरी डेट अंकित असते परंतू मेकअपच्या बाबतीत अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते. त्वचा तज्ज्ञांप्रमाणे मेकअप वापरताना काही वस्तूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. कारण एक्सपायर प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचेसंबंधी आजार उद्भवू शकतात. तर चला आज बघू कोणते प्रॉडक्ट किती दिवस वापरायला हवे ते:
 
लिपस्टिक
दैनिक मेकअप करणारे सर्वात अधिक लि‍पस्टिक वापरतात. परंतू खूप कमी लोकांना माहीत असेल की एक लिपस्टिक एका वर्षापेक्षा अधिक वापरणे योग्य नाही. एक्पायर लिपस्टिक यूज केल्याने ओठ काळे पडू लागतात.
 
लिप ग्लॉस
ओठांना शिमरी लुक देण्यासाठी लिप ग्लॉस वापरू शकता. दीड वर्षाने मात्र ग्लॉस बदलायला हवे.
 
कंसीलर
कंसीलरने चेहर्‍यावरील डाग लपून जातात. हे प्रॉडक्ट एका वर्षापेक्षा अधिक चालू शकतात परंतू कोणत्याही प्रकाराच्या ऍलर्जीपासून वाचण्यासाठी एका वर्षातच हे फेकून द्यायला हवे.
 
फाउंडेशन
स्किन इन्फेक्शनपासून बचावासाठी वेळेवारी फाउंडेशन बदलणे गरजेचे आहे. क्रीम कॉम्पॅक्ट फाउंडेशन 18 महिन्यात बदलायला हवे तसेच ऑयल फ्री फाउंडेशन 12 महिन्यापर्यंत वापरू शकता.
 
आय लाइनर
जॅल लाइनर तीन ते चार महिन्यात बदलून द्यावे. तसेच पेंसिल लाइनरने काही नुकसान होत नाही. आपण ये दोन वर्षांपर्यंत वापरू शकता.
 
आय शॅडो
क्रीम आय शॅडो एक वर्ष वापरू शकता जेव्हाकि पावडर आय शॅडो दोन वर्ष काम देतं.
 
मस्करा
मस्करा 3 ते 4 महिन्यात एक्सपायर होऊन जातं. म्हणून वेळेवारी हे बदलायला हवे.
 
फेस पावडर
दोन वर्षांपर्यंत फेस पावडर वापरणे योग्य ठरतं.  
 
ब्लशर
गाल गुलाबी करण्यासाठी ब्लशर वापरलं जातं. एका वर्षानंतर लक्ष असू द्या की याने त्वचेवर काही वाईट परिणाम तर होत नाहीये. त्या हिशोबाने आपण हे वापरू शकता.