रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (12:04 IST)

Nail Care Tips: हिवाळ्यात नखांची अशा प्रकारे काळजी घ्या

Nail Care Tips: हिवाळा ऋतू जवळपास सर्वांनाच आवडतो. कारण हिवाळा ऋतू प्रवासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी योग्य आहे. पण या ऋतूत आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. असे न केल्यास टाळूला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे आदी समस्या उद्भवू लागतात.
हिवाळ्यात तुमच्या त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. 

पण केस आणि त्वचेची काळजी घेताना आपण शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचा विसर पडतो. हिवाळ्यात नखे रुक्ष आणि कोरडी पडतात आणि ते तुटू लागतात. हिवाळ्यात नखांची अशा प्रकारे काळजी घ्यावी. 
 
क्यूटिकल क्रीम लावा-
अनेक वेळा नखे ​​साफ करताना क्युटिकल्स कापले जातात. पण असे करणे टाळले पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो की क्यूटिकल कापण्याऐवजी लोशन किंवा क्युटिकल क्रीम लावून त्यांची काळजी घ्या. 
 
नेल मास्कचा वापर करा- 
नखांची चांगली काळजी घेण्यासाठी नेलं मास्क लावा.या साठी  बेकिंग सोडा किंवा अंडी आणि मध लिंबूमध्ये मिसळा आणि नखांना लावा. नखांसाठी हा एक अतिशय चांगला नेल मास्क आहे.
 
नखांना श्वास घेऊ द्या-
हिवाळ्यात नखांवर नेलपेंट लावू नका असं केल्याने त्यांना श्वास घेता येणार नाही. म्हणून हिवाळ्यात नखांना नेलपेंट न लावता तसेच ठेवा. 
 
पाण्यात काम कमी करा-
हिवाळ्यात पाण्यात हात कमीत कमी घाला. नखे जास्त प्रमाणात ओली झाली की त्यांच्यात कोरडेपणा येतो. म्हणून पाण्यात जास्त काळ हात ओला करू नका. 
 
बेसकोट लावा- 
नखांना बेसकोट लावा. जेणे करून नखे धूळ, माती आणि घाणीपासून सुरक्षित राहतील. 
 
मॉइश्चराइजर लावा- 
हिवाळ्यात नखे कोरडी पडतात अशा परिस्थितीत नखांची आद्र्रता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना बदाम किंवा खोबरेल तेलाने मॉइश्चराइज करा. 
 
Edited By- Priya Dixit