रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (14:16 IST)

Strong Healthy Shiny Nails लांब आणि सुंदर नखे हवे असल्यास हे घरगुती उपाय अमलात आणा

Nails
Strong Healthy Shiny Nails आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेतो. विशेषतः मुली प्रत्येक प्रसंगी परिपूर्ण दिसण्यासाठी खूप मेहनत घेतात. लेटेस्ट आउटफिट असो किंवा ट्रेंडी हेअर स्टाइल, मुली परफेक्ट दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे तुमचा मेकअप आणि हेअरस्टाईल तुम्हाला सुंदर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याचप्रमाणे नखेही तुमच्या हातांना सौंदर्य देतात.
 
पण कधी कधी लांब आणि मजबूत नखं नसल्यामुळे तुमच्या हाताचं सौंदर्य कमी होऊ लागतं. जर तुम्हालाही यामुळे अनेकदा त्रास होत असेल तर काही सोपे घरगुती उपाय जाणून घ्या ज्याच्या मदतीने तुम्ही लांब, मजबूत आणि सुंदर नखे मिळवू शकता.
 
पेट्रोलियम जेली
आपण सर्वजण लहानपणापासून पेट्रोलियम जेली वापरत आलो आहोत. अनेकदा फाटलेले ओठ आणि त्वचेसाठी वापरलेली पेट्रोलियम जेली नखे मजबूत करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. तुम्ही तुमच्या नखांना मजबूत करण्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी पेट्रोलियम जेली लावू शकता. असे केल्याने नखे तुटण्याची समस्या कमी होते.
 
ऑलिव्ह ऑयल
जर तुमची नखे वारंवार तुटत असतील तर त्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई नखांना पोषण देते. ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमची नखे मजबूत तर होतीलच पण लांबही होतील.
 
लिंबू
जेवणाची चव वाढवणारे लिंबू नखांना मजबुती देण्यासाठीही उपयुक्त आहे. मजबूत आणि लांब नखांसाठी तुम्ही त्यावर लिंबू चोळू शकता. असे आठवड्यातून किमान 3 वेळा केल्यास फायदा होईल. लिंबूने नखांना मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.
 
खोबरेल तेल
खोबरेल तेल, जे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे, ते तुमच्या नखांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. दररोज नारळाच्या तेलाने नखांची मसाज केल्याने तुम्हाला आठवड्याभरात परिणाम दिसू लागतील. याच्या वापराने तुमची नखं मजबूत तर होतीलच शिवाय ते चमकतील.
 
संत्र्याचा रस
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध संत्र्याचा रस नखे मजबूत करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या आणि त्यात हात 10 ते 15 मिनिटे बुडवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
 
अस्वीकरण: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. कोणतीही समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.