सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मार्च 2022 (17:14 IST)

टॅल्कम पावडरचा वापर केवळ रंग उजळण्यासाठीच नाही तर या कामांमध्ये देखील होतो

टॅल्कम पावडरचा वापर रंग आणि ताजेपणा वाढवण्यासाठी केला जातो. हे आपण लहानपणापासून वापरत असाल. अनेकदा टॅल्कम पावडर जुनी झाल्यावर आपण फेकून देतो. पण आपल्याला हे माहित आहे का की आपण ब्युटी रुटीनमध्ये इतर अनेक प्रकारे टॅल्कम पावडर वापरू शकता? कसे काय चला तर मग जाणून घेऊ या.
 
* जर आपल्या पापण्या पातळ असतील तर आपण टॅल्कम पावडर वापरून आपल्या पापण्या दाट करू शकता. यासाठी मस्करा ब्रशमध्ये टॅल्कम पावडर घेऊन पापण्यांवर लावा. लक्षात ठेवा की आपल्याला पावडर हळुवारपणे लावावी लागेल. नंतर त्यावर मस्करा लावा. यामुळे आपल्या पापण्या दाट आणि जाड दिसतील. 
 
* अनेक मुलींना काजळ लावायला आवडते पण काही काजळ थोड्या वेळाने पसरू लागते. आपल्याला ही या समस्येचा सामना करायचा असेल, तर काजळ लावल्यानंतर टॅल्कम पावडर कांडी किंवा इअरबडने लावा. यामुळे काजळ पसरणार नाही आणि डोळेही मोठे दिसतील.
 
* तेलकट त्वचा असलेल्या मुलींना अनेकदा त्रास होतो की त्यांचा मेकअप जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत आपण  टॅल्कम पावडरच्या मदतीने आपला मेकअप सेट करू शकता, यासाठी फेस पावडरमध्ये टॅल्कम पावडर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर असलेले तेल शोषले जाईल आणि मेकअप बराच काळ टिकेल.
 
* उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होतात. याशिवाय जर आपल्या टाळूची त्वचा तेलकट असेल तर स्कॅल्पवर तेल साचल्यामुळे केस चिकट राहतात. अशा परिस्थितीत, जर आपल्याला कुठेतरी बाहेर जावे लागले आणि जर शॅम्पू करता येत नसेल, तर टॅल्कम पावडरचा वापर करा. यासाठी स्कॅल्पवर टॅल्कम पावडर शिंपडा आणि काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर कंगवा करा.