Eyebrow wig craze क्रेझ आयब्रो विगची
Eyebrow wig craze भुवया चेहर्याला उठाव देण्याचं काम करतात. जाड, दाट आणि रेखीव भुवया असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करण्याचं कामही या कमानदार भुवयांद्वारे होतं. पण अनेकींच्या भुवया पहिल्यापासूनच विरळ असतता. अशा वेळी आय ब्रो पेन्सिलच्या सहाय्याने भुवया दाट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण उठाव देण्यासाठी कृत्रीम भुवयांचा ट्रेंडही सध्या जोरात सुरू आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. अशा समारंभांमध्ये पायाच्या नखापासून केसांपर्यंत वेगवेगळ्या सजणार्या महिला भुवयांना तरी का सोडतील? म्हणूनच विरळ किंवा पातळ भुवया असणार्यांनी आता चिंता करण्याचं कारण नाही.
कृत्रीम भुवयांमध्ये वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. 'आयब्रो विंग्ज' या नावाने ओळखल्या जाणार्या भुवया पारदर्शक स्टिक ऑन लेसवर खर्याखुर्या केसांचा वापर करून तयार केल्या जातात. कॅन्सरसारख्या आजारामधील उपचार पद्धतींमध्ये भुवयांचे केस निघून जातात. अशा रुग्णांसाठी आयब्रो विंग्ज वरदान ठरत आहेत. पण फक्त रुग्णच नव्हा तर सौंदर्यसाधनेच्या हेतूनेही याचा वापर दिसून येत आहे. आयब्रो विंग्ज या इतर आयब्रो प्रॉडक्टच्या तुलनेत वापरणं सोपं असल्याने महिला याकडे आकर्षित होत आहेत. आयब्रो विंग्जच्या किटमध्ये हव्या त्या आकाराचे आयब्रो विग, ग्लू, ग्लू रिमुव्हर आणि क्लिजिंग लोशन यांचा समावेश असतो. तेव्हा भुवया विरळ असल्याची काळजी करत बसण्यापेक्षा बाजारात जा आणि आयब्रो विंग्ज खरेदी करा.