सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 26 मार्च 2024 (10:28 IST)

उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी घरगुती फेसपॅकचा करा उपयोग

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याकरिता नियमित दिनचर्येचे पालन करावे. ज्यामध्ये उन्हापासून रक्षण आणि स्वताला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. काही घरगुती फेसपॅकचा उपयोग करून उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला मऊ, चमकदार बनवा. 
 
मध, दही आणि गुलाबजलचा फेसपॅक
मध, दही आणि गुलाबजल या तिघ घटकांना एकत्रित करून याचे मिश्रण 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवावे. मग साध्या पाण्याने धुवून घ्यावे. 
 
ओट्स आणि बादाम फेसपॅक 
रात्रभर पाण्यात 10 बादाम भिजवून ठेवा यांना बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 मोठा चमचा ओट्स, 1 छोटा चमचा मध आणि आवश्यकतानुसार दही मिसळा. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा. कमीतकमी 15 ते 20 मिनट पर्यंत तसेच राहु द्या . मग साध्या पाण्याने धुवून घ्या.  
 
पपई आणि केळ फेसपॅक 
एका बाउलमध्ये पिकलेली पपईचे काही तुकडे  आणि अर्धे पिकलेले केळ मॅश करा. आता यामध्ये थोडेसे मध मिसळा. या तयार पेस्टला चेहऱ्यावर लावा. तसेच वाळल्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्या.  
 
तरबूज आणि काकडीचा फेसपॅक 
2 मोठे चमचे तरबूज आणि ककडीचा रस घ्या. त्यामध्ये 1 चमचा दूध पाउडर आणि दही मिसळा. या पेस्टला 15-20 मिनिटांपर्यंत चेहरा आणि मानेला लावा. मग थंड पाण्याने धुवून घ्या.     
 
काकडी आणि एलोवेरा फेसपॅक 
एक काकडी किसुन तिचा रस काढून घ्या. आता यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करून एकत्रित करा. या मिश्रणाला थोड़ावेळ फ्रीजमध्ये ठेवा मग आपल्या चेहऱ्यावर 15 से 20 मिनिटांसाठी लावा मग नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik