बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (13:44 IST)

लिंबू आणि कापूर वापरा, अनेक समस्या दूर होतील

आपण पूजेच्या वेळी कापूर वापरतो .पण कापूरचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. कापूरा ने खोकला देखील बरा केला जाऊ शकतो. कापूराचा जास्त फायदा घ्यायचा असल्यास त्यात लिंबाच्या  रसाचा वापर करता येऊ शकतो. लिंबात असलेले व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासह त्वचेचे आणि इतर आरोग्यदायी फायदे देतात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 डोक्याच्या उवांपासून सुटका  -  कापूरच्या मदतीने डोक्यातील उवांपासून बर्‍याच प्रमाणात सुटका मिळवू शकता, परंतु जर याचा फायदा होत नसेल तर कापूरमध्ये लिंबू मिसळून वापरू शकता. मात्र, या उपायामध्ये  सुहागाचाही वापर केला पाहिजे. यासाठी प्रथम सुहागा तव्यावर भाजून घ्या आणि नंतर आयसिंगमध्ये लिंबाचा रस आणि कापूर यांचे मिश्रण मिसळा. आता हे मिश्रण डोक्याला लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी, सौम्य शैम्पूच्या मदतीने आपले केस स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पहा. त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसेल.
 
2 दातदुखीला बाय-बाय म्हणा - जर आपल्याला दातदुखीची समस्या असेल तर आपण  लिंबू आणि कापूर यांचे मिश्रण घरगुती उपाय म्हणून वापरू शकता. दातदुखी झाल्यास लिंबाचा रस आणि कापूर प्रभावित भागात लावा. काही काळ असेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने गुळणा करा . आपण इच्छित असल्यास, तसेच ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला दातदुखीपासून आराम मिळेलच, पण केव्हीटी दूर होण्यासही मदत होईल.
 
3 पायांची काळजी घेते - जर आपल्याला घरच्या घरी अगदी सहज पायांची काळजी घ्यायची असेल तर लिंबाचा रस आणि कापूर वापरू शकता. हे मिश्रण केवळ आपले पाय स्वच्छ करत नाही तर टॅनिंग देखील दूर करते. पाय स्वच्छ करण्यासाठी सर्व प्रथम टबमध्ये कोमट पाणी घ्या. यानंतर या मध्ये लिंबाचा रस आणि कापूर घालून मिसळा. आता त्यात पाय बुडवा. ते काही वेळ बुडवून ठेवा आणि मग फूट स्क्रबरच्या मदतीने आपले पाय स्वच्छ करा. असे केल्याने पायातील घाण सहज बाहेर पडते. नंतर, स्वच्छ पाण्याच्या मदतीने पाय स्वच्छ करा.