शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (23:01 IST)

हे घरगुती स्क्रब चेहऱ्याचा रंग उजळतील, कसे बनवायचे जाणून घ्या

हिवाळ्यात त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा त्वचेवर कोरडेपणा आल्याने त्वचा सोलवटते . अशा प्रकारे त्वचेची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. थंडीच्या हंगामात  त्वचेला योग्य प्रकारे हायड्रेट न केल्यास त्वचेवर डेड स्किन येते, त्यामुळे चेहऱ्याचा रंग काळपटतो . त्यामुळे स्क्रबिंग करणे फार महत्वाचे आहे. काही घरगुती स्क्रब आहे ज्यांना वापरून चेहऱ्याचा रंग टिकवून राखू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
 होममेड स्क्रब 1
हे करण्यासाठी तुम्हाला साखर, ओट्स आणि मध लागेल. यासाठी प्रथम एका भांड्यात एक मोठा चमचा ओट्स घ्या आणि त्यात एक चमचा साखर घाला. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल टाका. तसेच मध देखील घाला. चांगले मिसळा आणि 5 ते 7 मिनिटे ठेवा. नंतर सर्व चेहऱ्यावर एकसारखे लावा आणि कोरडे होऊ द्या. हातात थोडे पाणी घेऊन ओल्या हातांनी मसाज करा.  
 
होममेड स्क्रब 2
हे बनवण्यासाठी तुम्हाला टोमॅटो आणि साखर लागेल. यासाठी एका भांड्यात चिरलेला टोमॅटो ठेवा. नंतर त्यात साखर घालून मिक्स करा. दोन्ही गोष्टी नीट मिसळून झाल्यावर हळूहळू चेहऱ्यावर लावा. दोन्ही हातांनी हळुवार स्क्रब करा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा. हे स्क्रब खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये असलेले पोषक तत्व चेहऱ्याचा रंग सुधारण्याचे काम करतात.