शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (09:00 IST)

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी हंगामाच्या बदलांसह त्वचेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
 
हंगामात त्वचा कोरडी होते.विशेषतः ओठाची त्वचा कोरडी होते.बऱ्याच लोकांची सवय असते की ते ओठ कोरडे झाल्यावर ओठांवर जीभ लावतात असं केल्याने ओठ अधिक कोरडे होतात. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण ओठांचा कोरडेपणा कमी करू शकता.
 

1 कोरफड जेल आणि साखर-1 चमचा कोरफड जेल आणि 1 लहान चमचा साखर घ्या दोन्ही एकत्र करून ओठांना स्क्रब करा. लक्षात ठेवा की साखर जाड नसावी.आपण हे रात्री झोपण्याच्या पूर्वी आणि सकाळी आपल्या ओठांवर लावू शकता.या मुळे ओठांना मॉइश्चरायझर मिळतो.
 


2 तूप आणि गुलाबाचे फुल- 1 चमचा साजूक तूप आणि 1 लहान चमचा गुलाब पाकळ्यांची पूड,मिसळून आपल्या ओठांना लावावी.असं नियमितपणे केल्याने ओठ गुलाबी आणि मऊ होतात.
 
 

3 काकडी- ओठांना कोरड पाण्याच्या कमतरतेमुळे होते.पाणी जास्त प्यावे आणि काकडीच्या तुकड्याचे बारीक काप करून ओठांवर 5 मिनिटे चोळा असं केल्याने ओठांचा त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो .
 

4 साय -जर आपले ओठ कोरडे होत आहेत तर ओठांवर थंड्या दुधाची साय लावा या मुळे ओठांची कोरड नाहीशी होते.
 

5 मध आणि पेट्रोलियम जेली- 1 बोट पेट्रोलियम जेली,2 थेंबा मध,दोन्ही एकत्र मिसळून ओठांवर लावा. 20 ते 25 मिनिट तसेच ठेवा.नंतर ओठांना स्वच्छ पुसून घ्या.असं केल्याने ओठ मऊ होतील.