बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (11:47 IST)

या व्हिटॅमिनच्या सेवनाने सुंदर आणि चकचकीत त्वचा मिळवा

प्रत्येकाला सुंदर त्वचा हवी असते. चमकदार आणि स्वच्छ नितळ त्वचा सर्वांनाच आवडते. ते मिळविण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत असतो.मग गोष्ट वर्कआउट ची असो, आहाराची असो किंवा आपल्या त्वचेच्या काळजी घेण्याची असो. आपण सर्व प्रकाराने काळजी घेतो, कारण चुकीची जीवनशैली आपल्या आरोग्यासह त्वचेवर देखील वाईट प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत योग्य आहार आपल्या त्वचेला स्वच्छ आणि चकचकीत ठेवण्यात मदत करते. गरज आहे तर असे काही व्हिटॅमिन्सला आपल्या आहारात समाविष्ट करण्याची जे आपल्या त्वचेला आतून पोषण देतात. चला तर मग जाणून घेऊ या अशा काही व्हिटॅमिन्स बद्दलची माहिती. ज्याचे सेवन आहारात केले पाहिजे.
 
* व्हिटॅमिन ए - 
व्हिटॅमिन ए आपल्या त्वचेला आणि आपल्या केसांसाठी आवश्यक असत. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए चे सेवन करावे. सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसान पासून त्वचेचे बचाव करत. म्हणून आपल्या आहारात व्हिटॅमिन ए चे समाविष्ट करावे.
 
* व्हिटॅमिन बी 3 - 
त्वचेच्या सरत्या वयाला कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी 3 चे सेवन केले पाहिजे. कारण ह्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावरील चमक कमी होते म्हणून ह्याचे सेवन करावे.
 
* व्हिटॅमिन के - 
चेहऱ्याच्या डागांना कमी करण्यासाठी व्हिटॅमिन के चे सेवन करावे. ह्याच्या कमतरते मुळे चेहऱ्यावर डाग होऊ लागतात. ह्याचे सेवन आवर्जून करावे.
 
* व्हिटॅमिन सी -
व्हिटॅमिन सी आपल्या सौंदर्येला टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. हे तर बहुतेक लोकांना माहितीच आहे. व्हिटॅमिन सी च्या सेवनाने आपण निरोगी त्वचे सह निरोगी केसांची इच्छा देखील पूर्ण करू शकता.