शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

वैक्सिंग करताना हे लक्षात ठेवा, वेदना होतील कमी

अनेक लोकांना वैक्सिंग करताना खूप वेदना होतात. स्कीवनवरून केस खेचले जातात त्यामुळे वेदना होणे साहजिक आहे. परंतू काही उपाय करून या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते.

पाळी असताना टाळा
पाळी सुरू असताना आपली त्वचा फार संवेदनशील असते. याव्यतिरिक्त डेट येण्यापूर्वीही वैक्सिंग करणे टाळावे. पाळी संपल्यावर शरीर नार्मल होतो तेव्हा वैक्सिंग करणे योग्य ठरेल.
 
कॉफी टाळा
ज्या दिवशी वैक्सिंग करवण्याचा प्लान असेल त्या दिवशी कॉफी पिणे टाळा. कॅफिनमुळे त्वचा उत्तेजित होते आणि वैक्सिंग करताना वेदना होतात.
एक्सफोलिएट करा
याने डेड सेल निघून जातात. याने डेड त्वचेच्या आत असणारे केसही निघतात. यामुळे केस खेचल्याने होणार्‍या वेदना कमी होतात.
 
गरम पाण्याने अंघोळ
वैक्सिंग करण्यापूर्वी थंड नव्हे तर गरम पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेचे रोमक्षिद्र खुलून जातील आणि त्वचा नरम होईल. अधिक वेळ गरम पाण्यात राहण्याने सर्व रोमक्षिद्र खुलतील आणि वैक्सिंगमध्ये सुविधा होईल.
 
लूज कपडे
वैक्सिंग दरम्यान लूज कपडे घालायला हवे. कारण यानंतर त्वचा काही वेळासाठी संवेदनशील असते. टाइट कपडे घातल्यामुळे खाज सुटणे किंवा इतर काही त्वचेचा त्रास उद्भवू शकतो. वैक्सिंगनंतर नॅचरल फायबरने तयार कपडे घाला ज्याने घाम फुटणार नाही.