काविळीवर उपचार

वेबदुनिया|
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला आज देत आहोत एका अनोख्या उपचार पद्धतीची माहिती.

काविळीची भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच. हा रोग माणसाचे शरीर ‍जीर्ण करुन टाकतो. योग्य उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती असते. त्यासाठी डॉक्टरकडे जाणे योग्य असते. पण काही लोक मात्र डॉक्टरकडे न जाता बाबा-बुवांकडे जाऊन उपचार करून घेतात. इंदूरमधील मनजीत पाल सलुजा हेही अशा उपचार करणार्‍यांपैकी एक आहेत. सलुजा यांचे दुकान असून, दुकानदारीव्यतिरिक्त ते करतात. आपल्याकडे ही अनोखी विद्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
ते रुग्णाच्या कानावर कागदाचा तुकडा लावतात आणि मेणबत्तीने त्याला जाळतात. हे करताना ते गुरुवाणीचा उच्चार करतात. मनजीत धर्माने शीख असले तरी त्यांची गणपती बाप्पावर निस्सिम श्रद्धा असून, आपल्या रुग्णांवर उपचार करण्‍यापूर्वी ते गणपतीची पूजा करतात. कागद जळाल्यानंतर कानाच्या कोपर्‍यांमध्ये पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ साचण्यास सुरुवात होते. मनजीत याला काविळ असे म्हणतात या पदार्थाच्या माध्यमातून काविळ रुग्णाच्या शरीराबाहेर पडत असल्याचा त्यांचा दावा आहे.
उपचाराला येणार्‍या रुग्णाला पहिल्या दिवशी आपल्या सोबत हार- फुले, अगरबत्ती, आणि नारळ आणावेच लागते. उपचारानंतर रुग्ण येथे यथाशक्ती दान करतात. आपण नि:शुल्क सेवा पुरवत असून, रुग्ण स्वेच्छेने येथे पैसे ठेऊन जात असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे.

हा उपचार म्हणजे अध्यात्माची शक्ती असून, आपल्याला देवाने दिलेली ही देणगी असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे. आयुर्वेदिक आणि अलेपॅथिक औषधांचे मिश्रण करुन ते आलेल्या रुग्णांना औषधही देतात. मनजीत रोज 80 ते 90 रुग्णांवर उपचार करतात.
आपल्याकडे येणार्‍यांमध्ये रुग्ण तर असतातच परंतु काही डॉक्टरही आपल्या नातेवाईकांना घेऊन आपल्याकडे येत असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे. मनजीत यांनी केलेला दावा आपल्याला खरा वाटतो का? विज्ञानाच्या या युगात असे घडू शकते का? आपल्याला काय वाटते आम्हाला जरूर कळवा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव

श्रीराम चालीसा: संकटाच्या काळी घ्या प्रभुचे नाव
श्री रघुबीर भक्त हितकारी। नि लीजै प्रभु अरज हमारी॥ निशि दिन ध्यान धरै जो कोई। सम भक्त और ...

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा

चैत्रगौर... एक पारंपरिक सोहळा
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज
श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी ...

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या

नववर्ष स्वागताच्या पद्धती: त्यांच़्या आणि आपल्या
सबंध भारतात अधिकतम चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. जगाचा आरंभ ...

गुढी- नवीन नात्याची

गुढी- नवीन नात्याची
जोशी काकू फ्लेटच्या दाराजवळ येवून थबकल्याच. रात्रभराचा प्रवास झाला होता. थकवा तर होताच पण ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...