शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

देवाला साखळदंडाने बांधतात तेव्हा....

WD
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला एक वेगळेच मंदिर दाखवतोय. या मंदिरात भक्तांनी देवाला चक्क लोखंडाच्या साखळदंडाने बांधून ठेवलय. मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यात मालवा-आगर नावाचं गाव आहे. या गावात केवडा स्वामी कालभैरवनाथ मंदिर आहे. या मंदिरातील कालभैरव बाबांच्या मूर्तीला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवलय. एका बाजूने बाबाचे हात बांधलेले असून दुसरी बाजू मंदिराच्या विहीरीला बांधलेली आहे.

कालभैरव बाबा भक्तांना काठीने मार देतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. या मारापासून वाचण्यासाठी बाबांना लोखंडाच्या साखळदंडाने बांधण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. बाबांना साखळदंडातून मुक्त केले तर काही खरे नाही, असे गावकरी म्हणतात.

हे मंदिर झाला राजपूत व गुजराती लोकांचे पूजनीय केवडास्वामी कालभैरव यांचे आहे. १४८१ मध्ये झाला राजपुतांच्या एका राजाला एक स्वप्न पडलं. त्यात आपले वाहून घेऊन चला असा आदेश होता. रस्त्यात गाडीचे चाक जिथे तुटून पजेल तिथे राज्य स्थापन कर असे सांगण्यात आले होते. राजाने त्या प्रमाणे केले. जिथे चाक तुटले तिथेच केवडास्वामी भैरवबाबाचे मंदिर बांधले. येथून काही राजपूत राजस्थानात निघून गेले. काही जण इथेच थांबले.

WD
केवडा स्वामींचे पक्के मंदिर बांधून शंभराहून अधिक वर्षे उलटली आहेत. पण त्यांच्या मूर्तीला साखळदंडाने कंधी बांधले ते मात्र कुणालाही माहित नाही. पण बाबांच्या दरबारात भक्तांची मनोकामना मात्र नेहमीच पूर्ण होते, असा मंदिराच्या पुजार्‍याचा दावा आहे.

भैरवबाबांचा महिमा एवढाच नाही. भैरवबाबा सिगरेट आणि दारूचे शौकीन आहेत. बाबांना मुक्त केले तर ते खूप त्रास देतील, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. बाबा काठ्या, मिठाई आणि दारू चोरतात, असे एका ज्येष्ठाने सांगितले. या नादापोटी बाबांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून त्यांना साखळदंडाने बांधले आहे.

WD
भैरवबाबा तामसी आहेत. या मंदिरातील मूर्तीला मद्य व सिगरेट वाहिले जाते. दिवसभरात किती तरी वेळा भैरवबाबाच्या मूर्तीजवळ ठेवलेली सिगरेट पेटवली जाते. बाबांना साखळदंडातून कधीही मुक्त केले जात नाही. कारण मोकळे सोडले तर बाबा कुणाला सोडणार नाहीत, अशी भीतीही आहे.

या चमत्कारिक देवाविषयी आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.