सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (11:37 IST)

माता चंडीच्या या मंदिरात रोज येतो अस्वलाचा परिवार

छत्तीसगडच्या महासमुंद जिल्यातील धुंचापाली येथे असलेले 150 वर्षे जुने चंडीमाता मंदिर निराळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. 
 
या मंदिरात सायंकाळच्या पूजेच्या वेळी रोज एक घटना घडते. या मंदिरात रोज एका अस्वलाचे कुटुंब देवीच्या दर्शनाला येते, मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते, प्रसाद घेते आणि जंगलात निघून जाते. या मंदिरात पूर्वी तंत्रपूजा केली जात असे असे स्थानिक सांगतात. मात्र 1950 पासून ते सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे. दक्षिणुखी देवीमुळे या मंदिराचे महत्व वेगळे असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात सायंकाळी आरतीच्या वेळी अस्वलाचा संपूर्ण परिवार येतो. वास्तविक माणूस आणि अस्वल आमनेसामने येणे घातकच. मात्र ही अस्वले कुणालाही दुखापत करत नाहीत. आरतीच्या वेळी एक अस्वल बाहेर थांबते आणि बाकीची मंदिरात जाऊन दर्शन घेतात. मग सगळे कुटुंब प्रदक्षिणा करते. प्रसाद घेते आणि आपल्यावाटेने जंगलात निघून जाते. या परिवाराचे नामकरण स्थानिकांनी जांबुवंत परिवार असे केले आहे.