भगवान शिवशंकराचा ''तुरूंग''
|
आम्ही येथे पोहोचलो तेव्हा तुरूंगात गजाआड असलेले कैदी नजरेस पडले. ते सर्वजण आपापल्या बराकीच्या आत भजन-कीर्तन करण्यात मग्न झाले होते. येथे प्रत्येक कैद्याला विशिष्ट क्रमांक दिला जातो. काही कैद्यांना येथे येऊन वर्षापेक्षाही जास्त काळ झाला आहे. येथील एका कर्मचार्याकडे इथल्या सगळ्या कैद्यांची कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी आहे. या कर्मचार्यानेच आम्हाला हा तुरूंग दाखविला. तुरूंगामध्ये पुरूष व स्त्रियादेखिल होत्या. त्यांना तुरूंगाधिकार्याच्या आदेशानंतरच येथून सोडले जाते. हा तुरूंगाधिकारी कोणी दुसरा तिसरा नसून भगवान शिवशंकर आहेत.
|
|
येथे कैद्यांना स्वातंत्र्य असूनही हे कैदी मुक्त आहेत, असे कुठेही जाणवत नाही. काही कैद्यांना पाहून त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असे वाटते. पण या मंदिराच्या पुजार्याच्या मते ही सगळी शिवशंभूची कृपा आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथे आल्यानंतर असाध्य रोग असलेले लोकही बरे होतात. पण त्यासाठी त्यांना नियमांचही पालन करावे लागते, असे त्याचे म्हणणे आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा.
