लाथेने उपचार करणारा मंसाराम...
|
छत्तीसगड या राज्यातील मनसाराम निसाद नावाचा माणूस अशा प्रकारे उपचार करतो. लाथ मारून, कानपटात मारून आपण रूग्णाला बरे करतो, असा दावा हे महाशय करतात.
छत्तीसगडची राजधानी रायपुर येथून जवळपास 75 किलोमीटर दूर आणि धमतरी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावरील लाडेर नावाच्या गावातील ही व्यक्ती अशा विचित्र तर्हेने इलाज करते. आम्ही लाडेर गावात पोहचलो तेव्हा मनसारामकडून उपचार करून घेण्यासाठी हजारोंच्या वर लोकांनी गर्दी केली होती. काही वेळाने मनसाराम इथे येऊन एका झाडाखाली बसला आणि त्याने एकानंतर एक रूग्णाला लाथ, थप्पड मारायला सुरूवात केली. इतर रूग्ण रांगेत उभे राहून आपला नंबर यायची वाट बघत होते.
|
हळू हळू मनसारामच्या इलाजाची ख्याती आजूबाजूच्या परिसरात पसरली. मग लांबून लांबून लोक त्याच्याकडे इलाजासाठी यायला लागले. आता तर त्याच्याकडे इलाजासाठी रांगा लागतात.
मनसाराम उपचारासाठी पैसे घेत नाही. पण रूग्ण त्यांना काही ना काही भेट देतात. रोग बरा करण्यासाठी रूग्णांना मनसारामकडे तीन वेळा जावे लागते. त्यामुळे साहजिकच तीन वेळा लोक त्यांना भेट देतात. उपचारासाठी इथं एवढी गर्दी होते, की त्यांच्यासाठी इथं खास एक हॉटेल सुरू झाले आहे. त्या हॉटेलवाल्याचीही चांगली कमाई होते.
मनसारामकडे उपचारासाठी येणारे
|
|
|
अशा पध्दतीने इलाज केल्यावर म्हणे मनसाराम अतिशय आनंदी होतात. पण या सगळ्या बाबी प्रसिध्दीसाठी पसरवल्या असाव्यात हे सहज कळते. अशा विचित्र उपचार पध्दतीबाबत तुम्हाला काय वाटते? ते आम्हाला जरूर कळवा.
