शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (08:38 IST)

महत्त्वाचा टप्पा पार, मुंबई विभागाद्वारे शंभरावी टेक्सटाईल एक्सप्रेस रवाना

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने, चलथान (सुरत विभाग) ते संक्रेल (खरगपूर विभाग, एसईआर) 100 वी टेक्सटाईल रेल्वेगाडी भरून रवाना करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
 
रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, यांनी पहिल्या गाडीला उधना येथून हिरवा झेंडा दाखवून‌‌ ती 1 सप्टेंबर रोजी रवाना केली होती. रेल्वेने हा टप्पा 5 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला आहे. 100 वी टेक्सटाईल रेल्वेगाडी भरून रवाना झाल्याने सुरत वस्त्रोद्योग क्षेत्राचा रेल्वेवरील वाढता विश्वास दिसून येतो.  दक्षिण पूर्व रेल्वेमधील शंकरेल, शालीमार आणि पूर्व मध्य रेल्वेमधील दानापूर आणि नारायणपूर ही प्रमुख गंतव्य स्थाने होती. या वस्त्रोद्योग एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनी एकूण 10.2 कोटी रुपयांचा महसूल  रेल्वेला मिळवून दिला आहे.