शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी 'आधार' सक्ती

एका महिन्यात आपण सहा वेळा रेल्वेच्या ‘आयआरसीटीसी’ वेबसाईटवरून ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर यापुढे आधारनंबर लिंक करावा लागणार आहे. आयआरटीसीटीच्या अकांऊंटला आधार लिंक केले नसले तर सहापेक्षा जास्त वेळा तिकीट बुक करता येणार नाही. आयआरटीसीटीने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. अर्थात आधार कार्ड लिंक केल्यानंतरही महिन्यातून 12 पेक्षा जास्त वेळा ऑनलाईन तिकीट बुक करता येत नाही. 
 
कसे कराल लिंक? 
 
आयआरटीसीटीच्या वेबसाईटवर लॉगइन केल्यानंतर ‘माय प्रोफाईल’ या विभागात आधारनंबर लिंक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येईल. हा पासवर्ड टाकल्यानंतर आयआरटीसीटीशी आपला आधार नंबर लिंक होईल. यानंतर काही वेळातच एसएमएसद्धारे आधार यशस्वीपणे लिंक केल्याचे कळवले जाईल.