गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2017 (12:46 IST)

एअर इंडियात सॉफ्टवेअर खरेदीत घोटाळा

air india software
अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल
 
2011 मध्ये एअर इंडियामध्ये सॉफ्टवेअरची खरेदी झाली होती. या प्रकरणी गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक अहवालात निदर्शनास आल्याने केंद्रीय दक्षता आयोगाने गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. निविदा काढण्याच्या आणि कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांचा तपास करण्याच्या सूचनाही आयोगाने सीबीआयला दिल्या आहेत. आयोगाच्या शिफारशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रक्रियेत एसएपीआणि आयबीएमला झुकते माप दिल्याचे सकृद्दर्शनी दिसत आहे. या व्यवहारामध्ये कोणा एका व्यक्तीला लाच मिळाली का,याचीही सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.