मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (15:05 IST)

एज़लो रियल्टीने मुंबईत एक प्रीमियम ऑफिस आणि रिटेल प्रोजेक्ट द मेट्रोपोल लॉन्च केले

Azlo Realty
रवेशिया ग्रुपचे रिअल इस्टेट व्हर्टिकल एज़लो रियल्टीने मुंबईच्या घाटकोपर पश्चिम भागात एक प्रीमियम कमर्शियल प्रॉपर्टी लॉन्च केली. हा पप्रोजेक्ट 0.41 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला 15-स्टोरे लँडमार्क आहे, जो ग्रुपद्वारे स्व-वित्तपुरवठा केलेला आहे. प्रोजेक्ट 359 चौरस फूट क्षेत्रापासून सुरू होणाऱ्या ऑफिस आणि रिटेल स्पेस प्रदान करण्यासाठी मल्टिपल फॉर्मेट डिझाइनवर विकसित केले जात आहे. प्रोजेक्टमध्ये 140+ कमर्शियल स्पेसेस आणि रिटेल स्पेसेसचे 3 स्तर आहेत. मेट्रोपोलमध्ये फ्लेक्सिबल बीमलेस कार्यालये, शहरी हिरव्या जागा, स्वयंचलित कार-पार्किंग आणि आधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत.
 
घाटकोपर हे निवासी मालमत्ता, औद्योगिक वसाहती आणि व्यावसायिक एन्क्लेव्हचे वेगाने बदलणारे शहरी मिश्रण आहे. हा प्रोजेक्ट लँडस्केपच्या एकूणच सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणार आणि भविष्यातील व्यवसाय केंद्र म्हणून उभरणार. हा प्रोजेक्ट मल्टिपल ट्रान्सीट मोड्सशी त्वरित ऍक्सेससह एक लँडमार्क लोकेशनचा आनंद घेतो, जे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे-कल्याण जिल्ह्यातील प्रमुख गंतव्यस्थाने आणि स्थानांशी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते.
 
लॉन्चबद्दल बोलताना एज़लो रियल्टीचे सीईओ क्रिश रवेशिया म्हणाले, "मेट्रोपोल, नेक्स्ट-जेन बिझनेससाठी सर्वात प्रलंबीत कमर्शियल रिअल इस्टेटची संधी घाटकोपरमध्ये येत आहे. हे भविष्यातील व्यावसायिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि उंचावण्यासाठी विचारपूर्वक डिझाईन केले गेले आहे. हे लँडमार्क  उभारण्यात एज़लो रियल्टीचे मुख्य उद्दीष्ट आमच्या ग्राहकांना उन्नत सुविधा, प्रगत अभियांत्रिकी आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळणारा अनुभव देऊन जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करणे आहे. या ग्रुपकडे आपल्या ग्राहक आणि व्यवसायातील भागीदारांसाठी मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची भव्य दृष्टी आहे."
 
लाँचची किंमत कॉम्पॅक्ट प्रीमियम ऑफिस स्पेससाठी 1.01 कोटी रुपये पासून सुरू होते. मार्च 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा या ग्रुपचा विश्वास आहे आणि ग्राहकांना वेळेवर ताबा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यासाठी एप्रिल 2022 पासून * दरमहा किमान 40,000 /- रुपये चे रेंटल ऍश्युरन्सचे विशेष लॉन्च ऑफर जाहीर केले आहे.