बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (20:32 IST)

5 रुपयांत १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाटी नवीन प्लान आणि ऑफर घेऊन येत आहे. तसेच कंपन्या कमी किंमतीत जास्त बेनिफिट ऑफर करतात. या यादीत आता एअरटेलने आपल्या युजर्संना एक जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर केले आह. ज्यात ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा मिळत आहे. तसेच या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते
 
telecom company Airtelच्या प्लानमध्ये मिळतोय ४.१५ रुपयांत १ जीबी डेटा
 
४.१५ रुपयांत १ जीबी डेटा तुम्हाला एअरटेलच्या ६९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केले जात. प्रत्येक दिवसाला १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
 
प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्समध्ये यात विंक म्यूझिक आणि एअरेटल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला फास्टटॅग खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.