सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (11:22 IST)

BSNL ची खास ऑफर कॉलच्या बदल्यात कॅशबॅक!

BSNL च्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनीने आपली ‘5 pe 6’ ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  आधी ही ऑफर कंपनीने 31 जुलैपर्यंत वाढवली (BSNL new cashback offer) होती. त्यानंतर आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या या ऑफरमध्ये (BSNLOffers) युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. या ऑफरमुळे ग्राहकांना दर महिन्याला 50 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
 
ही खास ऑफर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केली होती. जे युजर्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोनवर बोलतात त्यांच्यासाठी ही ऑफर आहे. लोकांचा लँडलाइन कॉलिंगकडे कल वाढावा यासाठी कंपनीने ही कॅशबॅक ऑफर आणली होती. 
 
ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या (Reliance Jio)आययूसी चार्जच्या घोषणेनंतर कंपनीने या ऑफरची घोषणा केली होती. त्यावेळी जिओने अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. 
 
BSNL new cashback offer या ऑफरनुसार युजर्सना 5 मिनिटांच्या कॉलच्या बदल्यात 6 पैसे कॅशबॅक मिळतात. यामध्ये एका ग्राहकाला दर महिन्याला जास्तीतजास्त 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. बीएसएनएलचे ग्राहक व्हॉइस कॉलद्वारे किंवा एसएमएस पाठवून 6 पैसे कॅशबॅक मिळवू शकतात. ही ऑफर बीएसएनएलच्या वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) सब्सक्राइबर्ससाठी आहे.
 
बीएसएनएलची ही कॅशबॅक ऑफर अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना 9478053334 नंबरवर ‘ACT 6 paisa’ टाइप करुन एसएमएस करावा लागतो. याशिवाय 18005991900 या टोल-फ्री क्रमांकावरव कॉल करुनही ही ऑफर अ‍ॅक्टिव्ह करता येईल.